किनवट| किनवट शहरातुन बेल्लोरीकडे जाणा-या डि.पी रस्त्याचे आज भुमिपुजन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या हस्ते संपन्न झाले हा मार्ग व्हावा या करिता बेल्लोरी, पिंपळगाव, मांडवा सह या पंचक्रोशितील शेतक-यांची गेल्या अनेक वर्षापासुन इच्छा होती. आमदार भीमराव केराम यांनी दिलेले आश्वासन नंतर बेलोरी रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागला असून या कामाच्या शुभारंभ करण्यात आला
शेतक-यांना शेती विषयक माल वाहतुकी करिता अत्यावश्यक असलेल्या व महत्वाच्या या मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित होते या मार्गामुळे किनवट शहर व परिसरातील शेतक-यांच्या शेताचे दळणवळण सुलभ होणार आहे. पावसापाण्यामध्ये ही शेतकरी या मार्गामुळे आपल्या शेतामध्ये प्रवास करुन शकतील. या मार्गाकरिता शहरातील अनेक विकासशील नागरीक आग्रही होते तर काही विघ्णसंतोषी नागरीकांनी खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आता सदर मार्गाचे भुमिपुजन होऊन काम हि सुरु झाल्याने या मार्गामुळे ज्या शेतक-यांना लाभ होणार आहे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व शेतक-यांनी या मार्गाकरिता वेळोवेळी आंदोलने केली होती त्याची आज फलशृती झाल्याने माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. आज संपन्न झालेल्या भुमिपुजन कार्यक्रमामध्ये नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष भाजपा नेते अनिल तिरमनवार, श्री दासरवार, वेंकन्ना माडपेल्लीवार, अल्लाउद्दीन, शेख रऊफ, सय्यद फारुख यांच्यासह परिसरातील शेतक-यांची उपस्थिती होती तर सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत होत असुन मे. वेदांत कंन्सट्रक्शन मार्फत काम केले जाणार आहे. सदर काम शिघ्रगतीने व उत्कृष्ट दर्जाचे होईल अशी ग्वाही कंत्राटदाराकडुन यावेळी उपस्थितांना देण्यात आली.