नांदेड| कर्तव्य पार पाडत असतांना कोव्हीड-19 या सांसर्गीक रोगाची लागन होवुन पोलीस अंमलदार सपोउपनि/5177 भगवान नागोराव वाघमारे तत्का. ने. पोस्टे बिलोली हे मरण पावले होते. त्यांच्या कुटुंबियांना आज पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे हस्ते ५० लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.
त्यांच्या कुटूंबियांना/कायदेशिर वारसदार 1) श्रीमती ज्योती भगवान वाघमारे, (पत्नी) 2) शैलेश भगवान वाघमारे, (मुलगा) यांना प्रत्येकी पंचवीस लाख रूपये असे एकुण पन्नास लाख रूपयाचा चेक प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे हस्ते आज दिनांक 24.08.2022 रोजी पोलीस अधिक्षक नांदेड यांचे कक्षात प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मा. श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक मुख्यालय, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी हे हजर होते.
