नांदेड| केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आले आहे. गेल्या अडीच वर्षांत आपण रस्त्यावर उतरून संघर्ष केला. राज्यात शिवसेना - भाजपा युतीचे सरकार आल्याने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. डबल इंजिनचे सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वत्र भाजपाचा झेंडा फडकवून कमळ फुलण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम करावे असे आवाहन भाजपचे संघटक मंत्री श्रीकांत भारतीय यांनी केले.
नांदेड जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक आनंद सागर मंगल कार्यालय घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर हे होते. प्रमुख उपस्थिती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर आ. राम पाटील रातोळीकर,आ. राजेश पवार, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रणिता देवरे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या जनतेने सेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत दिले होते परंतु उध्दव ठाकरे यांनी भाजपाशी गद्दारी केली. भाजपाशी गद्दारी करणारे शिवसेनेची काय हालत झाली हे तुम्ही पाहिल्यावर भाजपाशी टक्कर देण्याची हिंमत कोणी करणार नाही. नांदेड जिल्ह्यात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. या संधीचं सोनं करून जिल्हा परिषद व नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकत्यांनी कामाला लागावे असे आवाहन श्रीकांत भारतीय यांनी केले.
जिल्ह्याला मंत्री द्या-खा.चिखलीकर - राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार, एक खासदार आहे.त्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपद देवून बळ देण्याची विनंती संघटनमंत्री म्हणून आपण करावे अशी विनंती खा. चिखलीकर यांनी श्रीकांत भारतीय यांच्याकडे केली.
या बैठकीस भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, जिल्हा संघटनमंत्री गंगाधर जोशी, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, राजेश देशमुख कुंटूरकर, किशोर देशमुख, शिवराज पाटील होटाळकर, बालाजी बच्चेवार, प्रविण पाटील चिखलीकर, रामदास पाटील सुमठाणकर, खुशाल पाटील उमरदरीकर, सौ.संध्या राठोड, लक्ष्मण ठक्करवाड, बळवंत पाटील बेटमोगरेकर, चित्रा वाघ, प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधवराव उच्चेगांवकर यांनी केले.