हदगाव, शे चादपाशा| येथील पत्रकार वैजनाथ गुडुप यांची कन्या कु दिशा वैजनाथ गुडूप हिने हदगाव -हिमायतनगर या दोन्हीही तालुक्यातून एसएससी बोर्ड परीक्षेत मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पालका समवेत कु दिशा गुडुप या विद्यार्थिनीचा विवेकानंद माध्यमिक विद्यालय या संस्थेकडून सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, उपाध्यक्ष डॉक्टर मुकुंद जोशी, सचिव उत्तमराव टिकोरे, कोषाध्यक्ष अशोकराव टीकोरे, संचालक श्री ढाके शाळेचे मुख्याध्यापक बंडोजी भोसले यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमारी दिशा गुडुप या विद्यार्थिनीला एसएससी बोर्डाच्या परीक्षेत 97.80 टक्के घेऊन हदगाव- हिमायतनगर या दोन्ही तालुक्यात मुलीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्याने संस्थेचे नाव उज्वल केल्याने तिच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी तिला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांच्या परिश्रमामुळेच सर्व काही शक्य - कु. दिशा गुडुप
शाळेतील सर्व विषयाचे शिक्षक ज्या - त्या विषयात नुपून आहेत दहावी व बारावी मध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षक वृंद हे कसून अभ्यास करून घेतात. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन असते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी येऊन पालकांसोबत चर्चा केली जाते. त्यामुळे विवेकानंद शाळेच्या गुणवत्तेची परंपरा मागील कित्येक वर्षापासून असून ही परंपरा कायम ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. परंतु हे सर्व काही शक्य झाले ते केवळ आणि केवळ शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच अशी प्रतिक्रिया कु. दिशा गुडुप यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.