दिवंगत उत्तमराव वाघमारे यांच्या पार्थिव देहावर १८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता नवीन नांदेडातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. श्रीधर वाघमारे यांचे 'ते' वडील व मेजर तथा नांदेड पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी जी. डी. भालेराव अटकळीकर यांचे 'ते' मेहुणे होत.