माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेत सहभागी व्हा - सा.जिल्हाधिकारी सौम्या शर्मा -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
स्वातंत्र्यपुर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरु केलेली सार्वजनीक गणेशोत्सवाची पंरपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरीरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणुन मा.मुख्य निवडणुक महाराष्ट्र राज्य या कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजीत केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असुन यंदाच्या स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसोबतच सार्वजनीक गणेशोत्सव मंडळानाही या सपर्धेत सहभागी होता येणार आहे.              

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनीक गणेश मंडळाच्या देखाव्यांच्या माध्यमातुन आणी गणेशोत्सव सजावटीव्दारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. याच धर्तीवर ‘ माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’या स्पर्धेसाठी फोटो आणी ध्वनिचित्रफीत हे साहीत्य पाठवायचे आहे. मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणी मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सुत्र केंद्रस्थानी ठेवुन मंडळाना देखाव्यांच्या माध्यमातुन, तर घरगुती पातळीवर गणेश - मखराची सजावट,गणेश दर्शनासाठी घरी येणा-या भाविकामध्ये यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. 

तसेच मताधिकार बजावताना, जात,धर्म,पंथ,निरपेक्ष राहुन आपला लोकप्रतिनिधी निवडणे,पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयावर आपल्या देखाव्या सजावटीतून जागृती करता येवु शकते. सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली मा.मुख्य निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयाचे https://ceo.maharastra.gov.in/ या संकेतस्थळावर आणी समाजमाध्यमावर देण्यात आलेली आहे.  स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळानी आणी घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ आँगस्ट २०२२ ते ०९ स्पटेंबर २०२२ या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहीती भरुन आपल्या देखावा सजावटीचे साहीत्य पाठवायचे आहे. 

या स्पर्धेबरोबरच सार्वजनीक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डची जोडणी, नविन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागु झालेल्या चार अर्हता तारखा यासाठी प्रसार-प्रचार केला जावा आणी अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ९१- मुखेड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी तथा देगलुर उपविभागीय अधिकारी सहा.जिल्हाधिकारी, सौम्या शर्मा यांनी केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी