लोहा| ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मध्ये गुणवत्ता असते ते विद्यार्थी पुढे मोठ्या पदावर जातात.शहरी व ग्रामीण असा भेदभाव गुणवतेते नसतो .जिल्हा परिषदेच्या शाळा या मागे नाहीत. निळा येथील शाळेचे विविध उपक्रम पाहून शालेय जीवन आठवले. असा शब्दात कंधार उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी गौरव केला.तर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी विद्यार्थी -गुरुजनांचे कौतुक केले
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत् जि. प. प्राथमिक शाळा. निळा. (ता. लोहा) येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ गुरुजी होते. यावेळी बीडीओ शैलैश वाव्हळे ,गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के शिक्षण विस्तार अधिकारी संतोष व्यवहारे, विस्तार अधिकारी, कुलकर्णी गावचे सरपंच बालाजी गजले, उपसरपंच मा गजानन पा.मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उज्वला मोरे अध्यक्ष यांची उपस्थिती होते.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्. मन्मथरावजी किडे यांनी केले. सातवीच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादरीकरण केले. उपजिल्हाधिकारी मंडलिक यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले तर तहसीलदार मुंडे यांनी मार्गदर्शन केले शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, विविध देशभक्ती गीतावर , शेतकरी गीतावर नृत्यसादरीकरण केले. कु. श्रावणी रामचंद्र मोरे (वर्ग ३रा) कु. अरुषी कल्याण मोरे वर्ग ५ व ) या विद्यार्थीनींनी उत्कृष्ठ भाषण केले.
मान्यवरांनी बालकलाकारांचे विविध कलागुण पाहुन मान्यवरांनी पाच हजार रुपये बक्षीस दिले बक्षीस दिले. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी शाळेचा परीसर, गावाला असलेला शाळेचा आधार, गावाचा एकोपा, गावाने सप्त्यातुन केलेली एक लाख रुपये देगणी, विज्ञानप्रयोग शाळेसाठी केलेली मदत भौतिक सुविधा विद्यार्थ्यांचे कलागुण व गुणवत्ता पाहुन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल . महाबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन . शेख सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी . ,किडे, शेख श्री. लांडगे, मठपती, महाबळे सौ. मोरे मॅडम, सौ, कस्तुरकर मॅडम, सौ. स्वामी मॅडम व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले