गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे व सर्व शाळांच्या सहकार्याने हरघर तिरंगा उपक्रमाची जनजागृती
हिमायतनगर| उत्कर्ष मादसवार| भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्य वर्ष म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचं अनुषंगाने हिमायतनगर येथील गटशिक्षण विभागाकडून आज १० ऑगस्ट रोजी हिमायतनगर शहरातील शाळांमधून देशभक्तीपर गीतांचे समूहगाण हा उपक्रम राबविण्यात आला असून, यामध्ये शहरातील २ हजाराहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनीं आणि शिक्षक अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रैली काढून हर घर तिरंगा लावण्यात यावा असा संदेश देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी विपीन ईटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हयात आज सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधून देशभक्तीपर गीतांचे समूहगाण राबविण्यात यावे अश्या सूचना करण्यात आल्या होत्या. या उपक्रमात हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषदे शाळेसह खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत गायनात सहभाग घेतला.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात १० देशभक्तीपर गीत समूह स्वरात विद्यार्थी - विद्यार्थिनींनी गायिले. यात वंदे मातरम, जयोस्तुते श्री मह्ममंगले, नन्ना मुन्ना राही हू, आओ बच्चो तुम्हे दिखाये, छोडो कल की बाते, हम होंगे कामयाब, सारे जहाँ से अच्छा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, बलसागर भारत होवो व ये देश है वीर जवानों का.. या देशभक्तीपर गीतांचा समावेश होता. यावेळी बोलताना गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे म्हणाले कि, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी. आणि हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती व्हावी यासाठी आज समूहगायन करून शहरातील मुख्य रस्त्याने तिरंगा रैली काढण्यात आली.
यात शहरातील सर्वच शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास २ हजार विद्यार्थी व ६० शिक्षक - शिक्षकांनी यात उपक्रमात सहभाग घेऊन राष्ट्रीय कार्याला चालना दिली आहे. यासाठी नायब तहसीलदार अनिल तामस्कर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार ताडेवाड, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, केंद्र प्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षा, शिक्षिका यांनी सुयोग्य नियोजन करुन देशभक्तीपर समूहगाण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले असल्याचे त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले.