नांदेड| महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी निवडलेल्या कार्यकारिणीतून अध्यक्षपदी नगर जिल्ह्यातील अकोलेचे कॉ.कारभारी उगले यांची तर सरचिटणीसपदी नांदेडचे ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे 13 वे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथे संपन्न झाले. यात आगामी तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी कॉ.कारभारी उगले, सरचिटणीसपदी ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर, उपाध्यक्षपदी कॉ.भारती न्यालपेली तर सहसचिवपदी ऍड.कॉ.सुधीर टोकेकर, कॉ. अरविंद जक्का, खजिनदार बापूसाहेब कानोडे, कॉ.रेणुका वंजारी, कॉ.उदय चौधरी, कॉ. कृष्णाबाई झुंजूर, कॉ.सुमनबाई आहेर, कॉ.निवृत्ती दातीर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.