गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL

कोरोनानाच्या काळानंतर हिमायतनगरात गणरायाचे धुमधडाक्यात आगमन 


हिमायतनगर| रेल्वे, ट्रैक्टर, टेम्पोने शहरात आलेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल -गोपाल व युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया...च्या गजरात जल्लोषापूर्ण वातावरणात स्वागत केले. तसेच ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही गणेश चतुर्थीच्या दिवशी जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरी वर्गही आनंदात गणेशोत्सवात सामील झाले आहेत. 


भाद्रपद शुक्ल ४ दि.३१ ऑगस्ट बुधवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी अनेक दिवसापासून दडी मारलेल्या वरून राजाने स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत थाटलेल्या दुकानात विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपलानी एकाच गर्दी केली होती. तालुक्यातील हजारो गणेश भक्त शहरात दाखल होऊन ट्रैक्टर, ऑटो, जीप, दुचाकी, हाथगाडे, बैलगाडीसह अन्य वाहनाने गणेशाला आपल्या गावी प्रतिष्ठापना स्थळी घेऊन जातानाचे चित्र दिसून आले. 


मागील २ वर्ष गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट निर्माण झाले होते. यंदा गणरायाच्या स्वागतासाठी शेणाने सर्व निर्बंध हटवून धुमधडाक्यात उत्सव साजरी करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आजपासून गणेशोत्सव काळातील ११ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहेत. त्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्या विक्रीचे स्टाल, काळलावीची फुले, फळे, मक्काचे कणसे, केळीचे कंद, काकड्या यासह उपवासासाठी लागणारे केली, सफरचंद, सेप, डाळिंब व सजावटीच्या साहित्याने बाजारातील दुकाने फुलल्याचे दिसून आले आहे. तसेच शहरातील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात श्रीची स्थापना पुरोहित साई आणि श्री परमेश्वर बडवे याच्या मंत्रोचार वाणीत झाली. 


येथील श्री परमेश्वर मंदिरात सायंकाळी ५ वाजेच्या मुहूर्तावर गणरायाची प्रतिष्ठापना पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी मंदिराचे जेष्ठ प्रकाश शिंदे, माधव पाळजकर, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, मोतेवार सर, बाबुराव  भोयर, विठ्ठलराव फुलके, पोलीस निरीक्षक बिडी भुसनूर, पापा पार्डीकर, बंडू हरडपकर, देवराव वाडेकर, आदींसह अनेक गणेशभक्त महिला - पुरुष उपस्थित होते. तर मानाचा वडाचा गणपती मंडळाने देखील स्थापनेचा मुहूर्त साधून अभिषेक महापुराजा करून प्रसाद वितरित केला आहे. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्याने रूटमार्च काढून पथसंचलन केले. आणि शांततेची परंपरा कायम ठेऊन उत्सव पार पाडावा असे आवाहन पोलीस निरीक्षक बिडी भुसनूर यांनी केले आहे. 

बजरंग चौकचा राजाच नवं प्रशांत गणेश मंडळाकडून भव्य स्वागत 


हिमायतनगर शहरात गेल्या ५० वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या नवप्राशनात गणेश मंडळाच्या युवकांनी गणपती बाप्पाचे जलौषात स्वागत केले. येथील श्री परमेश्वर मंदिरातून ट्रैक्टरवर युद्धासाठी निघालेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या भूमिकेतील गणरायाची मूर्ती ठेऊन ढोल - ताश्याच्या गजरात शहरातून मिरवणूक काढत बजरंग चौकात स्थापनस्थळी नेली. 
सायंकाळी पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची प्रतिष्ठापना व आरती महापूजा संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाने परिसर दणाणून निघाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी