नविन नांदेड| सिडको परिसरातील घरे मुद्रांक आधारे हस्तांतर करण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले.
भारताचे माजी गृहमंत्री सिडको नगरीचे शिल्पकार मराठवाड्याचे भगीरथ मराठवाड्याचे वैभव जल प्रणेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृषटीकोनातून गरीब, कष्टकरी, कामगार, लोकांसाठी सिडको हडको नगराची निर्मिती करण्यात आली.आणि आज या सिडको हडको भागातून अनेक कला, क्रिडा, सांस्कृतिक अशा अनेक सर्वांगीण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहेत.
याचे सर्वश्रेय सिडको नगरीचे शिल्पकार स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना जात.आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून सिडकोचा विकास झपाट्याने होत आहे. आणि सिडकोतील जे मूलभूत प्रश्न आहे.
सिडकोचे घर हस्तांतरण करण्याचा ते प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे आणि सिडकोतील लोकांना दिलासा देण्याचे काम ना. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आधारे सिडकोतील घरांना मालकी हक्क द्यावा व सिडकोतील घरांची मूळ रक्कम घेऊन मालकी हक्क द्यावे असे ना. अशोकराव चव्हाण यांच्याकडे सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की सिडको तील लोकांच्या घरांचा प्रश्न मी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील व ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासन ना. अशोकराव चव्हाण यांनी सिडको वाशियाना दिले.
यावेळी महाराष्ट्र विधान परिषद प्रतोद व विधान परिषद काँग्रेस पक्ष गट नेते आ.अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर सौ जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, सभापती किशोर स्वामी, नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष प्रवक्ते तथा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस पक्ष प्रभारी.ॲड संतोष पांडागळे, सिडको ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष विनोद कांचनगिरे, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, नगरसेवक राजु काळे पाटील, सिध्दार्थ गायकवाड, सौ.मंगला गजानन देशमुख,
सौ.दीपाली संतोष मोरे,प्रा.डॉ.ललिता शिंदे बोकारे, भि. ना.गायकवाड, प्रा. अशोक मोरे, डॉ.अशोक कलंत्री, डॉ.नरेश रायेवार,प्रा.डॉ.रमेश नांदेडकर,प्रा.गजानन मोरे, नामदेव पदमने, गणेश खंदारे, राजु लांडगे, शेख असलम, वैजनाथ माने,देवीदास कदम, संजय कदम,प्रा.शशीकांत हाटकर, किशन रावणगावकर,प्रभु उरुडवाड, सौ विमलाबाई चित्ते ,सौ.अनिता गज्जेवार, श्रीमती पार्वती कोरडे, श्रीमती सुभद्रा कदम,सौ.संतोषी भाले, सौ.ज्योती कदम, भगवान जोगदंड, प्रकाश वानखेडे, अक्षय मुपडे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.