नायगाव, दिगंबर मुदखेडे| तालुक्यातील देगाव येथील रहिवाशी तसेच यशवंत ज्युनिअर कॉलेज उमरी येथील प्रा.नामदेव तुकाराम मोरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, अंतर्गत राज्यशास्त्र विषयात प्रा. डॉ. राजेंद्र ज्ञानोबाराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी पीएच.डी (डॉक्टरेट) पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या या यशाबद्दल लालबहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव, माजी आमदार मा. बापूसाहेब देशमुख गोरठेकर , ग्रामीण नेते सुभाषरावजी देशमुख गोरठेकर, उमरी पंचायत समितीचे उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, युवा नेते कैलास भाऊ देशमुख गोरठेकर तसेच यशवंत हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक के. एस. शिंदे सर, माजी उपप्राचार्य एम. एस. कदम सर, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पाटील बेंद्रे, पीपल्स कॉलेज नांदेड चे उपप्राचार्य प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड सर या सर्वांनी अभिनंदन केले.
मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस श्री. तुकाराम जी. मोरे यांचे नामदेव मोरे हे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, गावकरी व कर्मचारी वर्गातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे.