एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी आखरगा येथे स्वाक्षरी मोहीम संपन्न
मुखेड, रणजित जामखेडकर| जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यासाठी राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम व आ.प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाच्या वतीने तालुक्यातील मौजे आखरगा येथे निषेध करण्यात आला.
आज दि.३० ऑगस्ट रोजी तालुक्यातील मौजे आखरगा येथे शिक्षण परीषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुखेड तालुक्यातील होनवडज केंद्रातील सर्व शिक्षक बंधु भगिनींनी आवाहनास प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मुख्य मागणीसह शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे थांबवा त्यांना शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवु द्या. शिक्षण सेवक पद रद्द करून नियमित शिक्षकांची नियुक्ती करावी व नविन शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी काढून टाकण्यात याव्यात,सातव्या वेतन आयोगाचा खंड-२ प्रकाशीत करावा आदी शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी होनवडज केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्सफूर्तपणे सहभाग नोंदवला.तसेच आ.प्रशांत बंब यांच्या शिक्षक विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणिस दिलीपराव देवकांबळे, तालुकाध्यक्ष शिवाजी कराळे,केंद्रप्रमुख शंकर कुसूमकर,केंद्रीय मुख्याध्यापक मनोहर जाधव, विठ्ठलराव सुर्यवंशी, चित्रलवार सर,शिवाजी राठोड राठोड, तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव,का.सचिव नरसिंग जाधव गोविंद कॅदरकुंटे यांच्या सह होनवडज केंद्रांतर्गत सर्व मु.अ,शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.