तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या साहित्यामुळे बैलाची संख्या घटली
उस्माननगर, माणिक भिसे। शेतकऱ्यांचा खरा साथी सोबती वेळप्रसंगी जीवाला जीव देणारा स्वतः काबडकष्ट मेहनत करून दुसऱ्याला जगवणारा जगाचा पोशिंदा म्हणून दरवर्षी पोळा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दि.२६ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ढोलताशांच्या निनादात ,हर हर महादेव गर्जना करीत फटाक्यांची आतषबाजी करीत पोळा सण उस्माननगर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या साहित्यामुळे बैलाची संख्यात घट बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस कमी होत असल्याने ट्रॅक्टर चा ज्यास्त प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. उस्माननगर येथील श्री महारुद्र हनुमान मंदिरा भौवती मानकरी तथा बैल फिरविण्याचा मान अनेक वर्षांपासून मा.प.स.सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड व आनंदराव पाटील घोरबांड या परिवाराना मान आहे. यावर्षी मा.उपसरपंच आनंदराव पाटील घोरबांड यांना आहे. सकाळी ढोलताशांच्या निनादात वाजत गाजत मारूती मंदिरात येऊन शेंदूर लावून विधिवत पूजा अर्चा करून वेशीला तोरण बांधून जातात.
दिवसभर पशुपालक शेतात आपल्या सर्जा राजा ची जय्यत तयारी करण्यात मग्न होते.सायंकाळी साडे पाच वाजता आनंदराव पाटील घोरबांड व व्यंकटराव पाटील घोरबांड यांचे बैल मंदीरासमोर येवून नारळ फोडून पोळा सणाला सुरुवात करून वाजत गाजत बैलाची मिरवणूक काढतात. पाच फेऱ्या झाल्या नंतर गावातील बैलजोडी फेऱ्या मारण्यास लगबग सुरू होते. सांजश्रृंगार परिधान करून बैलांना सजवून मारुतीच्या पाय पडण्यास आणतात.
जन्मभर मालकासाठी राब राब राबणारा व मेहनत करणारा बैल मालकाला आपल्या जिवापेक्षाही जास्त प्रिय असल्याने तो त्याला जीवापाड जपत असतो. बैलाने केलेल्या कामाचे ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला पोळा हा सण सर्वत्र साजरा करतात .पोळा सणाच्या अगोदर दोन दिवसापासून बैलांना कोणत्याही प्रकारचे काम लावत नाहीत. बैलांना मारत देखील नाहीत. स्वच्छ करण्यासाठी आंघोळ घालतात तेल अंडी पाजवतात.बैलाच्या शिंगाना वेगवेगळ्या प्रकारच्या रंग लावतात अंगावर झुली पांघरून गोंडे लावतात गळ्यात घुंगराच्या माळा घालून वेगवेगळ्या पद्धतीने बैलांना सजविण्यात येते.
बळीराजा आणि नंदीराजा या दोन मित्राचा ऋणानुबंधाचा सण म्हणजे पोळा होय. यावर्षी पावसा आभारी पिके वाढण्याच्या मार्गावर असताना तुरळ ठिकाणी श्रावण सरी हाजरी लावली होती हिरवीगार पिके मुबलक पाऊस नसल्यामुळे व उभे पिके पाहुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी , शेतातील तनकटाने मात्र कंबरडे मोडले आहे.पिका पेक्षा तणकट वाढल्याने चिंतेत पडला आहे. जमीन मशागती पासून ते पेरणी , कोळपणी ,काढणी आणि धान्य घरी आणून टाकण्यापर्यंत शेतकऱ्यांना बैल जोडीची मदत मिळते. जेवढी शेतकऱ्यांना बैल जोडीची मदत मिळते, तसेच जेवढी जमीन महत्त्वाचे आहे तेवढीच बैलजोडी ही महत्त्वपूर्ण लाभदायक आहे.
दरवर्षी वर्षानुवर्षापासून पोळा सण साजरा केला जातो.पोळा सणापूर्वी तिनदिवसापासून बैल जोडीसाठी कासरा ,कानी ,मटाटी ,गोंडे , मोरकी ,वेसन ,झुल , बाशिंग ,घागरमाळा ,दोरकंड, अलंकार भूषणाची व्यवस्था करण्यात येते. पोळ्याच्या आदल्या दिवशी खांद मळणी केली जाते. दिवसभर बैल जोडीस कामाला न लावता त्यांना चालल्यानंतर धुतले जाते. बैलाची शिंग चाळणी, खुरं तोडणी, शेपूट गोंडा कातरणी आधी कामे केली जातात. पोळ्याच्या दिवशी पहाटेच बैल जोडी चारण्यासाठी शेताकडे नेण्यात येते ,. बैल जोडी चारल्यानंतर त्यांना धुण्यात येते , यानंतर बैलांना नवीन व्यसन, मोरखी ,घातल्या जाते. व शेंगांना रंगविण्यात येते , झुल ,बाशिंग घालून बैलजोडी सजल्यानंतर गावाकडे आणण्यात येते. दरम्यान शेतकऱ्यांच्या घरी लाल मातीच्या चिखलाची बैलजोडी गाय, वासरू, बैल बनविण्यात येते.
तसेच शेतातील अवजारे यांची रंगरंगोटी करून देवघरासमोर विधीवत पूजा करण्यात येते गावातील सर्व बैल जोड्या एकत्र पारासमोर उभ्या करून दुपारच्या नंतर मानकर यांची बैलजोडी फिरवल्यानंतर सर्व बैल जोड्या घेऊन शेतकरी श्री हनुमान मंदिरास पाच-सात किंवा अकरा वेढे घालतात मारुतीच्या मंदिराला बैलजोडी फिरवल्यानंतर परासमोर किंवा घरासमोर आपापल्या बैलजोडीचे विधिवत लग्न लावून त्यांना नैवेद्य चारला जातो .अनंदी , समाधानी ,हर्षमय वातावरणात शेतकरी वर्ग पोळा साजरा करतात. पुरण - पोळी , हरभऱ्याची ( कनीची ) भाजी असे पारंपारिक जेवण घरोघरी केलेले असते.
जन्मभर मालकासाठी राब राब राबणारा व मेहनत करणाऱ्या बैल मालकाला आपला जीवापेक्षाही जास्त प्रिय असल्याने तो त्याला जीवापाड जपत असतो बैलाने केलेल्या कामाचे ऋण व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. गावातील सर्व गावची बैल फिरवल्यानंतर तोरण तोडून घराकडे निघतात.घरोघरी बैलांची विधीवत पूजा करून मंगलाष्टक म्हणून लग्न लावले जाते.पुरणपौळीचे नैवेद्य दाखवला जातो.उस्माननगर परिसरात पारंपारिक पद्धतीने पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा पाहाण्यासाठी महीला, पुरुष, लहान बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोळा परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.भारती ,सपोउनिरक्षक पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.