अतिवृष्टीच्या दुष्काळाने सध्या पद्धतीने केली होती तयारी
हिमायतनगर, अनिल मादसवार| शंभूच्या नावाने हरहर बोला.. हर हर महादेव चा जयजयकार करत कोरोनाच्या २ वर्षाच्या काळानंतर दुष्काळाचे सावट असताना देखील बळीराजाने अत्यंत साध्या पद्धतीने सर्जा- राजा (ऋषभ राजा) चा पोळा सणं हर्षोल्हासात साजरा केला आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्ष बळीराजाला सर्जा-राजाचा पोळा सण आनंदाने साजरा करता आला नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे सर्व निर्बंध उठले असल्याने शेतकऱ्यांनी पोळ्याची जय्यत तयारी केली होती. नेहमिप्रमाणे यावर्षी नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची आगमन जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात होताच येथे नगरपंचायत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्जा -राजाची पूजा अर्चना केली. यावेळी उपस्थित आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी देखील मानाच्या बैलांची पूजा केली.
यावेळी हिमायतनगर शहरचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगरसेवक रामभाऊ ठाकरे, माजी जी.प.सदस्य समद खान, माजी संचालक सुभाष शिंदे, सदाशिव सातव, संतोष गाजेवार, अन्वर खान, भोयर गुरुजी, गोविंद बंडेवार, रामभाऊ सूर्यवंशी, शे रहीम पटेल, परमेश्वर मंदिरचे संचालक लक्ष्मण शक्करगे, माधव पाळजकर, अनिल मादसवार, बाबुराव होनमने, संजय माने, राम नरवाडे, दत्ता काळे, उदय देशपांडे, संतोष वानखेडे, योगेश चीलकावार, रमेश डांगे, ज्ञानेश्वर शिंदे, गजानन चायल, विलास वानखेडे, पंडित ढोणे, तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी ढोल - ताश्याच्या गजरात मनाच्या बैलाची भव्य मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठया प्रमाणात शेतकरी, नागरिक, आजी -माजी व आगामी निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून आसलेले राजकीय नेते सुद्धा या मिरवणुकीत सामील झाले होते.
वाजत गाजत मानाच्या बैलजोडीची मिरवणूक शहरातील बाजार चौकात आल्यानंतर येथे असलेल्या श्री शहरातील दक्षिण मुखी मारोती रायाच्या मंदिराच्या माईकवरून ५ वाजून १५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर पुरोहित गजुगुरु आणि साईगुरुच्या मधुर वाणीत ५ मंगलाष्टक म्हणून लग्न विधी पार पडला. लग्नानंतर लगेच पोळ्याची रीघ सुसाट वेगाने धावत सुटली ती आपल्या घरी जाईपर्यंत थांबली नाही. घरी जाताच वृषभ राजाची आरती, महापुजा करून पुरण पोळीचे नैवेद्य दाखविण्यात आले. तर बळीराजाच्या पायावर काकडी फोडून मजूरदार व निमंत्रीताना पुरण पोळीचे भोजन देण्यात आले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी यंदाची सुगी चांगली होऊ दे.. महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून मुक्ती दे... अशी कामना केली. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये आणि कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस निरीक्षक बी.डी.भूसनूर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्रावण मासात आलेल्या अमावास्येला पोळ्याच्या सन हजारो बैलजोड्या व शेतकरी, नागरिकांच्या साक्षीने साजरा केला गेला. पोळ्याच्या तयारीसाठी सकाळी ५ वाजताच उठून शेतकऱ्यांनी पळसाच्या मेढ्या आणून लक्ष्मी मानल्या जाणर्या उकिरड्यावर, गावातील देवाला व घराच्या प्रवेश द्वाराच्या दॊन्हि बाजूने ठेऊन दर्शन घेतल. सकाळी हनुमंतरायाला शेंदुराचे लेप व झंडे लाऊन, पूजा - अर्चना करून नारळ व साखरेचा प्रसाद चढून पोळ्याच्या मिरवणुकीची तयारी केली. तर महिलांनी देखील सकाळच्या रामप्रहरी उठून सडा-संमार्जन करून पानात वापरला जाणारा चुना व गेरूने शेती अवजारे व मेड्याची पूजा - अर्चना केली. लग्न मुहूर्त सायंकाळचा असल्याने लगेच बैलना अंघोळ घालून वार्निश, घुंगरमाळ, मोरके, कासरे, झुली, गोंडे, बेगडी, बाशिंग, नाडापुडी, नागेलीचे पान आदिने सजउन उत्सवाची जय्यत तयारी केली होती. येथील मंदिर व नगरपंचायती कडून लग्न मुहूर्ताची निश्चित वेळ सांगताच शेतकर्यांनी नवे वस्त्र परिधान करून आप -आपली बैल जोडी गावातील प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन मिरवणुकीत सामील होऊन लग्नसोहळ्याच्या ठिकाणी पोचली होती. त्यामुळे ठरलेल्या मुहूर्तवर सर्जा -राजाचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.