एसटी डेपो नांदेड आगारातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त; निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न -NNL


नांदेड|
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथील चालक पदावरील दोन कर्मचारी वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३१ जुलै २०२२ रविवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता संपूर्ण नांदेड आगार कर्मचार्‍यांच्यावतीने त्यांचा सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यामध्ये श्री पंडीत संभाजी पोहरे (चालक क्रं. १८७८७) यांनी १७ वर्षे सेवा व श्री. मनोहर खिरबाजी टिमकेकर (चालक क्रं. १८२०६) हे १८ वर्षे सेवा बजावणारे कर्मचारी यांचा समावेश होता. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. हनमंतराव ठाकूर हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक वाहतूक निरीक्षक मा.श्री. सलीम शेख, सुधाकरराव घुमे, विठ्ठल इंगळे, कामगार नेते चंद्रकांत कदम, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड, चार्जमन शिवाजीराव मगर व दोन्ही सेवानिवृत्त सत्कारमुर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम संयोजन समितीच्यावतीने श्री. राजेश गहिरवार, गुणवंत एच. मिसलवाड, बालाजी पडलवार, शिवहार मठपती, विश्‍वास जाधव यांनी मंचावरील सर्व मान्यवरांचा पुष्पहाराने हृदय सत्कार केला व प्रशासनाच्यावतीने सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. हनमंतराव ठाकूर यांनी दोन्ही सेवानिवृत्त चालक श्री पंडीत संभाजी पोहरे व श्री मनोहर खिरबाजी टिमकेकर यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रत्येकी रोख रक्कम दोन हजार रुपये बक्षिस, प्रवास बॅग देऊन सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. सी.पी. कदम, गौतम कोकरे, शामसुंदर टाक, दोन्ही सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय समारोप मा.श्री हनमंतराव ठाकूर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले की, श्री पंडीत पोहरे व श्री मनोहर टिमकेकर यांनी प्रवाशी सेवेमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कार्य केले असून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रवाशांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा देण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजेश गहिरवार यांनी मांडले. यावेळी कर्मचारी चंद्रकांत राठोड, कपील सोनसळे, संदीप देशमुख, शिवचरण मळगे, प्राण दामेरा, रुपेश पुयड, गंगाधर जोशी, निखील गालेवाड, सौ. श्‍वेता तेलेवार, आशा डोईबळे, प्रा. पांडूरंग बुरकुले, संतोष कुलकर्णी, राजेंद्रसिंघ चावला, बलजीतसिंघ मेजर, श्रीमती आशा वाघमारे, संदीप पोहरे, अविनाश पोहरे, गजानन जाधव, मुख्याध्यापक गोविंद टिमकेकर हे उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी