हुजपा मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदी साहित्यिक प्रेमचंद जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी -NNL


हिमायतनगर।
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग व तसेच हिंदी विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवा अंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच हिंदीचे प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांची संयुक्त जयंती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाचे प्रा. एम. पी. गुंडाळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. बी. डोंगरे हे लाभले होते. तसेच हिंदी विभागाच्या डॉ. शेख शहेनाज आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता बोंढारे या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स विभागाचे सर्व विभाग प्रमुख आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. एल. बी. डोंगरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्रातील चळवळ व साहित्यातील योगदान याविषयी सविस्तर मतं मांडली. तर डॉ. सविता बोंढारे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. हिंदीचे सुप्रसिद्ध साहित्यिक ज्यांना कथा सम्राट म्हणून ओळखले जाते. असे मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यावर सविस्तर भाष्य डॉ. शेख शहेनाज यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा. गुंडाळे यांनी केला.

या संयुक्त जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमाचे संयोजन तसेच सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार डॉ. कृष्णानंद पाटील यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी