राज्याचे गृहमंञ्याला आमदार भेटले
हदगाव, शे चांदपाशा| पोलिस स्टेशन अतर्गत आसणा-या निवघा (बाजार) च्या पोलिस चौकीला पोलिस स्टेशनचा तात्काळ दर्जा दया. अशी मागणी हदगाव विधानसभा क्षेञाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मुबईला प्रत्यक्षात भेटुन देवुन केली आहे.
त्यांनी दि ११ जुन २०२१ ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या पोलिस चौकीला जवळपास ५८ (आठ्ठावन वर्ष) होत असुन, ४० गावे जोडलेली आहेत. ही पोलीस चौकी नादेड हिगोली यवतमाळ सिमेवर आहे लोकसंख्येच्या प्रमाणात इथं यापुर्वीच पोलिस स्टेशन निर्माण होणे गरजेच होत. त्या अनुषंगाने इथल्या नागरिकांची मागणी होती. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
लोकसंख्याच्या प्रमाणात या पोलिस चौकीला मान्य पदापेक्षा ही पोलिसांची संख्या अगदी कमी आहे. या सर्व बाबींचा विचार करुन निवघा (बाजारला) नवीन पोलिस स्टेशन तात्काळ मंजुर करावे. आशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
माजी गृहमञ्यांनी पण लक्ष घातले होते.....
राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर पाटील हे एका कार्यक्रमा निमित्तानं नादेड शहरात आले असता तेव्हा हदगाव तालुक्याचे पञकार निवघा [बाजार ] या गावाचे काही प्रतिष्ठित नागरिक तात्कालिक गृहमंत्री स्व. आरआर पाटील यांना नवीन पोलिस स्टेशन निर्माण करण्याच्या बाबतीत भेटले होते. या बाबतीत लगेच पोलिस आधिक्षका कडुन माहीती घेतली व त्वरित अहवाल पाठविण्याच्या संबंधातांना त्यावेळी सुचना केल्या होत्या. लगेच माहीती पण गृहविभागाला गेली पण नेमके कुठं माशी शिंकली. निवघा (बा) पोलिस स्टेशन थंडबसत्यात गेल. आता विद्यमान आमदार यांनी या जीवलग प्रश्नांवर प्रत्यक्षात राज्याचे गृहमंत्री यांची प्रत्यक्षात भेट घेवुन त्या़ना परिस्थिती समजावुन सागितली आहे. या मुळे नविन पोलिस स्टेशन स्थापनेला गती मिळेल अशी आशेची किरण निवघा (बा) वासीयाकरिता निर्माण झाली आहे.