नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ३२ गावात व शहरी भागातील ५ ठिकाणी बैलपोळा सण विधीवत पूजा करून प्रत्येक गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे महाआरती करून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरी भागात लोकप्रतिनिधी गावातील संरपच, ऊपसंरपच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक ,युवक, ग्रामस्थ यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता,
बैलपोळा सणांचा निमित्ताने ग्रामीण भागात सकाळ पासूनच शेतकरी बांधवानी आपल्या सर्जा राजाची सजावट करून जय्यत तयारी केली होती, भायेगाव येथे सायंकाळी पाच वाजता बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुकदम यांनी मानाचा बैलांनी मारोती मंदीर प्रदिक्षणा नंतर विधीवत पूजा करून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, ऊपसंरपच बालाजी कोल्हे, सदस्य शंकर खोसडे, शिवाजी खोसडे,जेष्ठ नागरिक अशोक पाटील,परबतराव खोसडे,राम पाटील कोचार, नागोराव कोल्हे, शिवानंद पाटील, पोलीस पाटील सुमनबाई खोसडे यांच्यी उपस्थिती होती.
तुप्पा गावात हनुमान मंदिर देवस्थान येथे विधीवत पूजा करून प्रथमच या वर्षी बैलाचे सामुहिक लग्न सोहळा पारंपरिक वाधवृंद व ढोलताशांच्या गजरात लावण्यात आला, व नंतर महादेवाच्या आरती ने या सोहळ्याची सांगता झाली, यावेळी संरपच ज्ञानेशवर यन्नावार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी पाटील कदम,देवराव टिपरसे,शेख चांद पाशा तुपेकर,गुलाब कदम, दिलीप कदम, व गावातील जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती,तर बाभुळगाव येथे हनुमान मंदिर येथे बैलपोळा सणांचा निमित्ताने सर्जा राजा ची विधीवत पूजा करण्यात आली, यावेळी मानकरी बळीराम पांचाळ, संरपच पुंडलिक मस्के, ऊपसंरपच प्रतिनिधी माधव बोडके, विश्वनाथ मस्के,माधव बोडके, माणिका मस्के, तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यभान मोरे, जगन्नाथ बोडके, सुनिल मस्के यांच्या शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
वाजेगाव,वडगाव,पिंपळगाव मिश्री,इंजेगाव,वाडीपुयड,पुणेगाव,बोढार तर्फे हवेली,गाडेगाव, धनगरवाडी,नागापुर, फत्तेपूर, सिध्दनाथ,राहेगाव, किक्की, कांकाडी, विष्णुपुरी,खुपसरवाडी,वाघाळा,असरजन,असदवन, मार्कंड,पिंपळगाव निमजी,गंगाबेट, गोपाळ चावडी,बाबुळगाव, कौठा, वसरणी, पांगरी,वाहेगाव,धनेगाव, कल्लाहाळ,बळीरामपुर, गुडेगाव, भनगी या गावात गावातील हनुमान मंदिर देवस्थान येथे प्रदिक्षणा झाल्या नंतर विधीवत पुजा करण्यात आल्या नंतर मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.
बैलपोळा सणांचा निमित्ताने शहरी व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली ७ सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक,५१ पोलीस अंमलदार ,४१ होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती गोपनीय शाखेचे अंमलदार बालाजी दंतापलले , चंद्रकांत बिरादार यांनी दिली.