अजीत दादा पवार यांचा लखनसिंघ लांगरी तर्फे सत्कार -NNL


नांदेड।
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते माजी उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार हे नुकतेच अतिवृष्टि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी रविवारी (ता. 31 ) रोजी  पहाटे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर उपाध्यक्ष स. लखनसिंघ लांगरी यांनी अजीत दादा पवार यांची विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांचा सिरेपाव आणि गुरुद्वाराची प्रतिमा देऊन सत्कार केला. 

काही दिवसापूर्वी अजीत दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी अजितदादाच्या वाढदिवसानिम्मित लखनसिंघ लांगरी यांनी गुरुद्वारा तखत सचखंड हजूरसाहिब येथे अरदास केली होती. अजितदादांचे आरोग्य स्वस्थ राहावे आणि त्यांना समाजसेवा करण्याची शक्ति लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली होती. याभेटीत लखनसिंघ लांगरी यांनी त्यांना सिरेपाव भेंट देऊन वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या सोबत पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अजीत दादा पवार यांनी गुरुद्वारात अरदास केल्यामुळे लखनसिंघ लांगरी यांना धन्यवाद दिले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी