उस्माननगर, माणिक भिसे| आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका लोहा कंधार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा पूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याचे सुतोवाच युवानेते विक्रांत दादा शिंदे यांनी हाळदा येथील कार्यकर्ता बैठकीत केले.
कंधार तालुक्यातील कौठा बारूळ सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हाळदा येथे विशेष बैठकीचे आयोजन लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी कौठा ,बारूळ सर्कलमधील सर्व आमदार शामसुंदर शिंदे समर्थकांनी युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांनी कौठा बारूळ सर्कल मधुन जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढवावी असा आग्रह केला होता.
या सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव विक्रांत दादा शिंदे यांनी कौठा बारूळ सर्कल मधुन आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्ण ताकतिनिशी लढवणार असल्याचे जाहीर करून मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या सर्व जागा पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना विक्रांतदादा शिंदे यांनी स्पष्ट केले यावेळी लोहा कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे,रोहित पा शिंदे,कंधार खरेदी विक्री संघाचे उपसभापती अरुण पाटील कदम, शेकाप जिल्हाध्यक्ष योगेश नंदनवणकर, बाळू पानपट्टे, दत्ता पा कौसल्ये, रणजित पाटील, हौसजी कांबळे, सलाम साहेब, गंगाधर चिखलीकर, सरपंच हणमंत कदम, प्रफुल येरावर सह सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच सह कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी लोहा कंधार मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून लोहा कंधार मतदार संघातील सर्व जिल्हा परिषदेच्या जागा व पंचायत समितीच्या सर्व जागेवर विजयी संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन करुन लोहा व कंधार पंचायत समिती ताब्यात घेण्याचे आवाहन यावेळी विक्रांत दादा शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले, लोहा कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहून कामाला लागण्याचे आवाहन विक्रांत दादा शिंदे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्ता मेळाव्यातील कार्यकर्त्यांना केले.