बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येचा उलगडा; सहा जणांच्या वळल्या मुसक्या -NNL

पत्रकार परिषदेत नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली यांची माहिती 


नांदेड|
नांदेडचे प्रसिद्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येचा उलगडा करण्यात नांदेड 
पोलिसांना यश आलं आहे. या हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य काही आरोपींनी या हत्याप्रकरणी अटक होऊ शकते, अशी माहिती नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली यांनी स्पष्ट केलं. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रासह एकूण सहा राज्यात पोलिसांनी तपास केल्याचा खुलासा नांदेड पोलिसांकडून करण्यात आला. संजय बियाणींच्या हत्येनंतर नांदेडमध्ये काही जणांनी खंडणी वसुलीचा गैरप्रकार सुरु केला. त्यामुळे धास्तावलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तसंच अजूनही जर कुणी खंडणीसाठी धमकावत असले, तर अशांनी पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केलं आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि. ५ एप्रिल २०२२ रोजी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे राहते घरासमोर गोळया झाडून हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२, ३०७, ३४ भा.द.वि. आणि  सहकलम ३/२५ आ. ह का प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर नांदेड पोलिसांनी तपस केलं, मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर या खुनाच्या तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. यासाठी आंदोलने झाली. मात्र खुनाच्या घटनेचा उलगडा होण्यास विलंब लागत होता. 

या गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली नांदेड परिक्षेत्र यांचे आदेशान्वये या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापना करण्यात आली होती. सदर एसआयटी पथकाचे प्रमुख विजय कबाड़े, अपर पोलीस अधीक्षक भोकर आणि मदतीला निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखल्लीकर, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी व्ही माने. पी. डी. भारती, संतोष शेकडे शिवसाब घेवारे, चंद्रकांत पवार पोलीस उपनिरीक्षक दशरथ, गंगाप्रसाद दळवी, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्ताबय काळे, गणेश गोटके यांचा समावेश होता. यांनी तपासाची चक्रे गतिमान करत महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस छाणे विमानतळ यांचे मदतीने चालू होते. 

दरम्यान महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. या दरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करुन 1) इंद्रपालसिंघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर वय ३५ वर्ष, 2) मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे वय २५ वर्ष, ३) सतनामसिंघ ऊर्फ सत्ता पि दलबिरसिंघ शेरगिल वय २८ वर्ष, ४) हरदिपसिंध ऊर्फ सोनु पिनीपाना पि. सतनामसिंध बाजवा वय ३५ वर्ष, ५) गुरमुखसिंध ऊर्फ गुरी पि. सेवक वय २४ वर्ष ६) करणजितसिंघ पि. रघबिरसिंघ साहु वय ३० वर्ष सर्व रा. नांदेड यांना अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संजय बियाणींच्या हत्याकांडानंतर या घटनेचा फायदा घेवून नांदेड शहरात खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या विरुद्ध देखील स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास धमकीचे पंटर येत असल्यास त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक नांदेड प्रमोदकुमार शेवाळे यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी