मराठवाडा ग्रामीण कार्यकर्ता अभ्यासपीठ शिकवण....चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या घरी लग्न...ना हुंडा, ना आहेर -NNL


बिलोली।
बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथील समाजसेविका पंचकुला वड्डे आणि नायगाव तालुक्यातील धूपा शंकरनगर येथील मारोती वड्डे यांनी हुंडा विरोधी चळवळ अगदी नेटाने चालवली. स्वतःच्या मुलीचे लग्न ना हुंडा,  ना आहेर... या पद्धतीने ७ जुलै रोजी होणार आहे. यासाठी मराठवाड्यातील समाजसेवक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बिलोली स्थित दिशा केंद्र संचलित मराठवाडा ग्रामीण कार्यकर्ता अभ्यासपीठ बिलोली येथे घडलेले बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथील पंचफुला वड्डे आणि नायगाव तालुक्यातील धुप्पा शंकरनगर येथील मारुती वड्डे  यांनी हुंडा विरोधी चळवळ मोठ्या नेटाने चालवली.

नॅन्सी गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांच्या सहवासात ही चळवळ अधिक प्रगल्भ झाली होती. विशेष म्हणजे हे वड्डे दाम्पत्य कोणत्याही लग्नात सहभागी झाल्यानंतर हुंडा घेतलेल्या किंवा दिलेल्या व्यक्तींच्या लग्नात सहभागी होऊन हुंडा घेणे आणि देणे याविषयी नाराजी प्रगट करत भोजन न करता निघून जात असत. ही शिकवण मराठवाडा ग्रामीण कार्यकर्ता अभ्यासपिठाने दिली होती. याचे तंतोतंत पालन करण्यात गायकवाड परिवारासह वड्डे परिवार अग्रणी आणि गोविंद मुंडकर मित्र मंडळ  सहभागी होते. 

वड्डे परिवार स्वतःच्या मुलीचा विवाह सोहळा चळवळीतील शिकवणीप्रमाणे करण्याचा निर्धार केला आहे.हा विवाह सोहळा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील  नायगाव बाजार येथे सात जुलै 2022 रोजी होत आहे. या विवाह सोहळ्यास मराठवाड्यातील ग्रामीण कार्यकर्ता अभ्यास पिठाचे समाजसेवक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी