नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत चार जिल्हे येतात. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर, या चार जिल्ह्यामध्ये विद्यापीठाशी संलग्नित वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या जवळपास ३६०आहे. यामधील विद्यार्थ्यांची संख्या ही १ लक्ष २५हजार आहे. याशिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा सहभाग. सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने जवळपास १ लाख ५१ हजार घरावर ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत देशांचा तिरंगा ‘ध्वज’ आम्ही फडकविणार आहोत. असा निर्धार आज करीत आहोत. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.
ते बुधवार दि.२० जुलै रोजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित आजादी का अमृत महोत्सवाच्या बैठकीमध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत कार्याध्यक्ष प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यकांत जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, प्रा. डॉ.वैजनाथ अनमुलवाड यांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले संपूर्ण देश ‘आजादी का अमृत महोत्सव’साजरा करीत आहे. यामध्ये आपलाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रत्येक महोत्सवाचे दस्तऐवज होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. संशोधन, शैक्षणिक, संस्कृती आणि खेळावर जेवढे कार्यक्रम होतात या सर्वांचे दस्तऐवज पुढील पिढीसाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे या महोत्सवानिमित्त जे काही कार्यक्रम घेण्यात येतील त्यांचे दस्ताऐवज तालुकानिहाय करण्यात यावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित्यांना केले.
‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांनी मार्गदर्शन करतांनाम्हणाले की, मागच्या दोन वर्षांमध्ये जे काही ‘अमृत महोत्सव’ निमित्त कार्यक्रम ठरविण्यात आले होते ते कोरोनामुळे आपण पूर्ण करू शकलो नाही ते सर्व आता आपण पुढे करणार आहोत.‘हर घर तिरंगा’ पासून सुरुवात करू, विद्यार्थ्यांना स्वतःच्या आणि आजूबाजूच्या घरावर ‘ध्वज’ उभा करण्यासाठी प्रेरणा देऊ. दानशूर व्यक्तीकडून ‘ध्वज’ घेऊन त्याचे योग्य असे वापर करावे, ‘आझादीका अमृत महोत्सव’ निमित्त घेण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचेछायाचित्रासहित संपूर्ण माहितीचा दस्तऐवज करावा. या सर्व माहितीचा समावेश तालुकानिहाय माहितीच्या अंकांमध्ये करावा. असा सलाही त्यांनी या वेळी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्यं स्वामीजींच्या प्रतिमेस चंदन हार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले. या बैठकीस ‘आजादी का अमृत महोत्सव’ समितीचे सदस्य, प्राचार्य वप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.