आ.रातोळीकर यांची कल्पकता ठरली चर्चेचा विषय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विशेषतः नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र असणार्या वह्यांचे वाटप करण्याची कल्पकता त्यांनी दाखविली.
आ.रातोळीकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्याचा मानस व्यक्त केला होता. शुक्रवार दि.22 जुलै रोजी जिल्ह्यातील मुखेड, धर्माबाद, कंधार, मुदखेड, अर्धापूर, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, उमरी, नायगाव, देगलूर, नरसी, रातोळी यासह विविध ठिकाणी वह्यांचे वाटप करण्यात आले.
वह्यांचे वाटप करतानाच नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने त्यांचे छायाचित्र मुद्रित करण्याचे काम आ.रातोळीकर यांनी केले. त्यांच्या या कल्पकतेचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकार्यांनी कौतुक केले आहे. रातोळीकरांचा हा उपक्रम जिल्ह्यातही चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्ह्यात पक्षाचे मोठे संघटन असताना, केवळ रातोळीकरांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधले.