उस्माननगर, माणिक भिसे। मागील आठवड्यापासून महाराष्ट्रासह जिल्हा व लोहा - कंधार तालुक्यातील उस्माननगर पो.स्टे. परिसरात आणि बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी ,नाले , ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झालेली आहे. तरी नागरिकांनी मोटारसायकल चालवताना खबरदारी म्हणून विशेष काळजी घ्यावी असे आवाहन उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने सपोनि देवकते यांनी केले आहे.
नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत जाताना नागरिकांनी ओलांडून जाऊ नये ,तसेच परिसरात व जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम चालू असल्याने कच्चे व तात्पुरते पूल बनविण्यात येत आहेत . या पुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरुन. जाने टाळावे , पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी पुलावर किंवा नदी काठावर जाऊ नये , ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, किंवा होण्याची शक्यता आहे .
अशा ठिकाणच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे , अथवा प्रशासनाला कळवावे , आत्यवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये , विद्युत खांबापासून सावधान राहावे , तसेच तुटलेल्या( विजेच्या) लाईटच्या तारखेपासून सावध राहावे , प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे ,असे. उस्माननगर पोलिस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.