अतिवृष्टीन नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या - आष्टी येथील शेतकऱ्यांचे तहसीलदाराना निवेदन -NNL


हदगाव,गजानन जिदेवार।
मागील आठवड्यापासून आष्टी तामसा परिसरा सहित हादगाव हिमायतनगर तालुक्यातील सततधार पाऊस सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शन ही झाले नाही. सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. सतत धर पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेटीची संकट निर्माण झाले.

 शेतकऱ्यावर आर्थिक कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा. असे मागणीचे निवेदन आष्टी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत दिलेले आहे.

चालू खरीप हंगामामध्ये आष्टी तामसा महसूल मंडळात सतत पाऊस सुरू आहे. पावसामुळे असं की शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाची अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाचा उशीर आगम झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरण्याची संकट ओढावले होते .काही शेतकऱ्यांची तर पदर मोड करून दुबार पेरणी केली होती. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगले स्थितीत होती .

परंतु गेल्या पाच दिवसापासून सतत धार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत लहान ओढी नदीकाठीच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदार झाला आहे .संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे असे निवेदनाची पत्र आष्टी येथील नागरिकांनी आज तहसीलदार यांना दिलेली आहे. यावर येथील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी