मुसळधार पावसाने किनवट - हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग ४ झाला होता बंद -NNL

खैरगाव जवळ असंलेल्या अर्धवट पुलामुळे ३ ते ४ तास वाहतूक होती ठप्प

पैलतीरावर झाली होती वाहनांची रीघ 


हिमायतनगर/नांदेड,अनिल मादसवार|
मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या वादळीवारे व मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे इस्लापूर- हिमायतनगर परिसरात असंलेल्या खैरगा येथील पुलावरून पाणी वाहू लागले असून, पुलाचे काम गेल्या ३ वर्षपासून संत गतीने होत सल्याने एक ट्रक फसल्याने वाहतूक खोळंबली होती. तर पर्यायी पुलावरून पूर वाहू लागल्याने किनवट- हिमायतनगर महामार्ग ३ ते ४ तास बंद पडला होता. यामुळे पुलाच्या पैलतीरावर वाहनांची रीघ लागली होती. 


माहूर- भोकर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील 3 वर्ष पासून सुरु आहे. सदरचे काम कणाराऱ्या  ठेकेदारांनी रस्त्याचे काम सुरु करण्याच्या आदी या महामार्गावर असलेल्या नाल्याच्या ठिकाणी पुले, पुलमोरे उभारून रस्त्याचे निर्मिती करणे अपेक्षित होते. मात्र संबधीत ठेकेदारांनी उपलब्ध झालेल्या शासकिय निधीवर डोळा ठेऊन थातुर-मातुर पद्धतीने रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पर्यायी रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिक वाहनधारकांना, नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील अर्धवट खोदून ठेवलेल्या पुलाच्या कामामुळे अनेक अपघात होऊन काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अश्या अनेक घटना घडूनही ठेकेदाराने कामाची गुणवत्ता आणि गती वाढविली नाही.


त्यामुळे अनेकदा या रस्त्याच्या तक्रारी झाल्या मात्र ठेकेदाराच्या कामात काहीच फरक पडला नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होताच पावसाने महामार्ग बंद पडणे, चिखल व उन्हाळ्यात धुळीच्या त्रासाने वाहनधारकांना प्रचंड त्रासाचा सामना करून घर गाठावे लागले आहे. दि १२ मंगळवारी रोजी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे येथील पुलाच्या कामामुळे करण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने तासनतास किनवट हिमायतनगर मार्ग बंद होऊन वाहतूक ठप्प झाली होती. तर येथे एक ट्रक फासून बसलायने मार्ग बंद पडलं होता. हि माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अगोदर फासलेला ट्रक काढण्यास भाग पडल्यानंतर ४ तासाने वाहतूक सुरु झाली असली तरी अर्धवट पुलामुळे मोठ्या अडथळा झाला आहे.


यामुळे अनेक नागरिकांनी ठेकेदारांच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, तर तीन वर्षांपासून रस्त्याचे काम व पुलाची उभारणी करण्यात कुचराई करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही अवस्था तर आणखी ३  महिन्याच्या पावसाळ्यात वाहनधारकांना मोठया अडचणीत काढावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन रस्ता व पूल निर्मिती कामामध्ये हलगर्जीपणा दाखवणार्या ठेकेदारांच्या कामाची कसून चौकशी करावी आणि लवकरात लवकर दर्जेदार रस्ता व पूल बांधावे आणि होणाऱ्या त्रासापासून नागरिक, वाहनधारक व गावकर्यांना मुक्ती द्यावी अशी रास्त आपेक्षा माजी सरपंच राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ता दिनेश राठोड व या भागातील नागरिकांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी