रयत क्रांती संघटनेचे बालाजी पाटील ढोसणे यांची मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
मुखेड| मागील दहा दिवसापासुन मुखेड तालुक्यात व परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या सहा दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांनी राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेल द्वारे पञ पाठवुन केली.
याबरोबर मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही ढोसणे यांनी केली. सुरु असलेल्या खरीप हंगामामध्ये बार्हाळी,मुक्रामाबाद, येवती, जांब, चांडोळा, एकलारा, सावरगांव, दापका या महसूल मंडळात संततधार पाऊस सुरू आहे,पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते,काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती.
परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे,व तालुक्यातील सांगवी भादेव येथील तरुण विधवा महीला लेंडी नदीला आलेल्या पुरात वाहुन जाऊन मृत्युमुखी पडली असुन तात्काळ निराधार बालकांना मदत करण्याचा सुचना आपल्या स्तरावरुन प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंञ्याकडे केली.
या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी व तसेच यासंदर्भात राज्यसरकारकडे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषिमंञी सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातुन पाठपुरावा करून अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेहीरयतचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,तालुकाध्यक्ष नवनाथ तारदडकर,शहराध्यक्ष संगीत जाधव,दिलीप बनबरे, यांनी सांगितले आहे.