किनवट, माधव सूर्यवंशी| नगर परिषद आणि साने गुरुजी रुग्णालयाच्या संयुक्तविद्यमाने शहरात फिरता दवाखान्याची सुरुवात केली असून, लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे. गल्लीबोळापर्यंत रुग्णसेवेची गाडी जाऊन प्रत्येकाची तपासणी करुन मोफत उपचार करीत अाहेत. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार आणि त्यांच्या टीमच्या संकल्पनेतील स्तुत्य उपक्रमाला १५ जुलै पासून सुरुवात करण्यात आली असून, नगरवाशियांनी स्वागत केले आहे.
सलग दहा दिवसापासून संततधार पाऊस चालू होता. पैनगंगानदीसह नाल्यांना महापूराने थैमान घातले होते. पुरग्रस्त नगरातील लोकांच्या बचावासाठी शहरातील शाळांमध्ये आश्रय दिला होता. पुराचे घडूळ व दुर्गंधयुक्त पाणी, सर्वत्र ओलावाचओलावा असल्यामुळे आजाराचा धोका ओळखून नगर परिषदेतील लोकनेत्यांनी साने गुरुजी रुग्णालयाचे डाॅ.अशोक बेलखोडे यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांंनीही ग्रीनसिंग्नल दिला. दोघांच्याही संयुक्त विद्यमाने शहरातील पूरबाधित गंगानगर, नालागड्डा, रामनगर, इस्लामपुरा, मोमीनपुरा अशा भागातील नागरिकांना डेंगू, मलेरिया व साथीच्या आजारा पासून बचाव करण्यासाठी १५ जुलै पासून फिरता दवाखाना सुरु केला.
औषध पुरवठ्याचे ओझे गनर परिषद उचलत आहे. नाल्यांमध्ये जंतूनाशक औषध टाकल्या जात आहे. तालुका आरोग्य विभागानेही योगदान द्यायला हरकत नसावी असा सूर ऐकू येत आहे. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यकंट नेम्मानिवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, नगरसेवक अभय महाजनांसह नगरसेवकं तसेच स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, स्वच्छता दूत बाळकृष्ण कदम व इत्यादींची उपस्थिती होती. फिरत्या दवाखान्यामध्ये ३ डॉक्टर्स, ४ परिचारिका व १ सेवकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.