हिमायतनगर| येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गीता पठण ग्रंथाचा समारोप आज दि.१६ जुलै रोजी करण्यात आला. भजन महाआरती नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे येथील श्री परमेश्वर मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा सततच्या पावसामुळे ज्ञानेश्वरी पारायणऐवजी पुरोहित कानात गुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून गीता पाठ ग्रंथाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस चाललेल्या या ग्रंथ पठणाचा आज दि.१६ जुलै रोजी करण्यात आला.
यावेळी ग्रंथ पठण करणारे पुरोहित तथा हभप. कांता गुरु वाळके यांच्या शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भजन कीर्तन त्यानंतर महाप्रसादाने समारोप करण्यात आला. यावेळी संचालक माधव पाळजकर, अनिल मादसवार, बाबुराव भोयर गुरुजी, यांच्यासह महिला - पुरुष भजनी मंडळी उपस्थित होते.