किनवट, माधव सूर्यवंशी| गत 12 दिवसापासून संततधार पावसाने थैमान घातले आहे. शहरा काठेने जाणार्या पैनगंगेणे रौद्ररूप धारण केले आहे. परिणामी पैनगंगे काटेवरील बाधित क्षेत्रा जवळील नागरिकांची जीवित व वित्तीय आणि होऊ नये यासाठी किनवट नगर परिषदेने आपत्ती व्यवस्थापना करिता नगरपालिका कर्मचाऱ्यांची टीम सक्रिय ठेवली आहे.त्यासाठी परिस्थितीनुसार आपत्ती ग्रस्त नागरिकांनी तात्काळ उल्लेखित सदर कर्मचाऱ्यांना फोन करून मदत घेण्याचे आवाहन कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी व प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
किनवट शहराला लागून असलेल्या पैनगंगेने रौद्ररूप धारण केले आहे.नदी काठोकाठ तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे काठे वरील बाधित क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती अति तात्काळ मदत करण्यासाठी एक कर्मचारी टीम सक्रिय करण्यात आली आहे.
त्यासाठी मोमीनपुरा तौफिक खान, जमीरुद्दीन 98 22 67 95 23 रामनगर, किरण कलगोटवार सुरेश पुलवाडकर, मनोज माकपेलीवार, संदीप हंडोरे, श्याम कलगोटवार, अजय मंत्रीवार 95 18 36 63 89 गंगानगर, रमेश नेमानीवार, निखिल वाघाडे, अजय दंडोरे, गजानन गाडगे 96 23 63 61 82 गंगानगर, बाबासाहेब मुखरे विद्यालय, वेंकट सेवनकर 770 90 30 72 8 फारूक खत्री, बाबू कल्पेलीवार, स्वामी मंत्रीवार, इस्लामपुरा, गंगानगर जिल्हा परिषद शाळा रेल्वे स्टेशन, अल्ताफ गफूर 98 50 88 43 36 राजू पिल्लेवार,रोहित जार्गालवार, प्रकाश सावंनपेलीवार आणि इस्लामपुरा अतिख खान 70 830 30 90 3 राजेश कुंटलवार, संतोष कल्पे लिवार, भगवान भंडारे, अशी बाधित क्षेत्रातील पीडित नागरिकांच्या व्यवस्थापन निवारणासाठी सदर कमिटी गठीत करण्यात आली आहे.
सदर भागातील पीडित नागरिकांनी संबंधित वर दर्शविलेल्या कर्मचाऱ्यांना फोन करून तात्काळ मदत घ्यावी. असे आवाहन व सूचना किनवट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी नागरिकांना केले आहे.