किनवट, माधव सूर्यवंशी| तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून सततच्या संतधारामुळे सर्वत्र आहाकार माजला असून तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने पुराचे पाणी शेतात, वस्तीत शिरल्याने शेतकऱ्यांचा पिकाचे नुकसान झाले तर गुरा जनावराचे अतोनात नुकसान झाले आहे.
यातच पैनगंगेला मोठा पूर आल्याने पैनगंगा तिरालगत आसलेल्या साईबाबा , गजानन बाबा मंदिर परिसरात मोठी गोशाळा असून या ठिकाणी पूराचे पाणी घुसून गोशाळेतिल चारा डेपो पूर्णतः पाण्याखाली गेल्याने चार्याचे मोठे नुकसान झाले तसेच गोशाळेतिल सुमारे दोनशे ते तिनशे गुरे जनावराणा गोमाता प्रेमिणी भर पावसात जनावरांचे स्थलानंतर केले पण जनावरांचा चाराच पाण्यात गेल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहे. त्यांना देखील शासनाकडून मदत मिळवी म्हणून गोमाता प्रेमी बोलतांना दिसत आहे. गोशाळेत काही गुरे आसे आहे की ? त्यांना जागच सुद्धा हालता येत नाही तेव्हा या गुरुंना चार्याची नितांत गरज आहे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सहायक जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार ,नगर परिषद प्रशासन परिस्थितीवर वाच ठेवून असतानाच पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे किनवट शहरातील जवळपास दोनशे ते अडीचशे कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले . किनवट / माहूर विधानसभे आ. भिमराव केराम यांनी उद्भवलेली परिस्थीती गांभिर्य पूर्वक हाताळन्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत .