मागील एक वर्षापासुन शहरातील बंद असलेली अभ्यासिका १० दिवसात चालू करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड शहरातील जुन्या नगर पालिकेच्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी अभ्यासिका तयार करण्यात आली पण सध्या ती बंद अवस्थेत असल्याने मा. नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार,शिक्षण प्रेमी तसेच तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने मुखेड तहसिलसमोर दि. २६ जुलै रोजी न.प प्रशासनाच्या विरोधात संततधार पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यानी आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
जुन्या नपच्या जागी अंदाजे ४३ लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेली अभ्यासिका मागील एक वर्षापासुन तयार करुन शोभेची वस्तु बनली होती सदर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी चालू करावी अशी मागणी शिक्षणप्रेमींच्या वतीने दि. २१ जुलै २०२२ रोजी करण्यात आली होती पण सदर अभ्यासिका चालु केली नसल्याने सर्व शिक्षण प्रेमींनी व विद्यार्थ्यांनी दि. २६ जुलै २०२२ रोजी तहसिल कार्यालयासमोर धरणे दिले. सकाळपासुनच पावसाला सुरुवात झाली होती तरीही भर पावसात शेकडो विद्यार्थ्यानी छत्र्या धरून सहभाग नोंदवला यावेळी नायब तहसिलदार महेश हांडे व मुख्याधिकारी धनंयज थोरात यांनी आंदोलक विद्यार्थ्याना भेट घेऊन खोळंबलेली अभ्यासिका येत्या १० दिवसात चालु करण्याचे लेखी आश्वासन दिले.
सदर आंदोलन यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्यासह ज्ञानेश्वर डोईजड, संदिप पिल्लेवाड यांच्यासह आडेपवार मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले तर यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विठल इंगळे, डॉ. रंजीत काळे, अँड गोविंद डुमणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड, शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, शिवानंद जाधव, शिवाजी गायकवाड, बालाजी ढोसणे, दिनेश आप्पा आवडके, संजय वाघमारे, नाईक, प्रदिप पा हसनाळकर,माधव देवकत्ते, संदिप पोफळे, प्रमोद मदारीवाले, केतन मामडे, मन्मथ मस्कले, जयप्रकाश कानगुले, विशाल गायकवाड,
कृष्णा पुलगुमवार, योेगेश मामीलवाड, विशाल वाडेकर, विशाल राठोड, विशाल बनसोडे, मारोती घाटे, अदनान पाशा, राहुल घोगरे, शंकर पिटलेवाड,संतोष घाळेवाड, काशिपाथ श्रीरामे, यागेश कामघंटे, शिवा तमशेट्टे, विश्वदिप वाघमारे, सचिन गोत्राळ, अथर्व घोगरे,प्रथमेश डोईजड, ओम शिंदे, अजय कांबळे, बालाजी हाके, नागेश कांबळे, वैभव वाघमारे, समिर शेख,मारोती गंगनर, रोहीत बनसोडे,सय्य्द रिहान,सुरज वाघमारे,साईनाथ गवाले,शिवाजी वाघमारे, किरण वडजे, रवि गिरी, सुमेध गायकवाड, व्यंकट ताटे,शेख अली आफताबसाब, शाबिर शेख,बालाजी गोरे,मलिकार्जुन नरोटे, सचिन इंगळे, समिर शेख,अविनाश सिंगनवाड,बालाजी श्रीरामे, सुरज घाटे,प्रदिप कडमपल्ले, त्रिभ्ुवन पाटील, वैभव देवमारे,साईनाथ कुद्रे, विद्यार्थिनी प्रज्ञा गायकवाड, पूजा इंगोले, कोमल मुद्रुके, रितिका कबीर, चट्टे पूजा, ऋतुजा बंडे, गौरी पांपटवार, विशाखा सोनकांबळे, रिया कांबळे, यांच्यासह शेकडो विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.
विद्यार्थींनींची लक्षणीय उपस्थिती..
सदर अभ्यासिका तात्काळ चालु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींची उपस्थिती सुध्दा लक्षणीय होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धरणे आंदोलनास सुरुवात केली व तदनंतर तहसिलदार व मुख्याधिकारी यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.