जादूटोणा विरोधी कायदा राज्यस्तरीय वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन -NNL

सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम


नांदेड|
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पाच दिवसीय निवासी जादूटोणा विरोधी कायदा वक्ता प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे १८ ते २२ जुलै २०२२ रोजी लोणावळा येथील श्री वागळ जैन चॅरिटेबल ट्रस्ट येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 

आज कार्यशाळेचे उदघाटन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र राज्याचे सचिव मा.सुमंतजी भांगे हे ऑनलाईन आभासी पद्धतीने सामाजिक बांधिलकी हे विभागाचे काम आहे म्हणून या विभागामार्फत अनु. जाती,जन जाती,भटके यांच्यामध्ये जनजागृती करण्यात यावी हा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकियदृष्टीने विकसित व्हायला हवे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या प्रवीण प्रशिक्षकशासाठी सामाजिक बांधिलकी जोपासना करून तळागाळातील लोकांपर्यंत या विभागाच्या योजना पोहचले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे समाजकल्याण आयुक्त तथा सदस्य सचिव पीआयएमसी डॉ.प्रशांतजी नारनवरे हे उपस्थित होते.  तत्पूर्वी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य संघटक तथा पीआयएमसीचे सदस्य  हरिभाऊ पाथोडे यांनी केलं ,शाळेचे मुख्य प्रशिक्षक व पीआयएमसीचे सहअध्यक्ष  श्याम मानव हे पाचही दिवस कार्यशाळेतील सदस्यांना प्रशिक्षण देणार आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन व चर्चा केली. याबरोबरच पीआयएमसीचे सदस्य मधुकर कांबळे, सुरेशजी झुरमुरे, रवींद्र खानविलकर, शरद वानखडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून  समारोप महाराष्ट्र राज्यचे समाजकल्याण आयुक्त तथा सदस्य सचिव पीआयएमसी डॉ.प्रशांतजी नारनवरे हे उपस्थित जणांना या प्रसंगी शुभेच्छा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन कसा रुजला पाहिजे याविषयी वेगवेगळ्या उदारणातून दिली अगदी प्राचीन काळापासून भारतात भगवान बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे दाखले देऊन त्याचे कार्य पुढे न्यावे येत्या काळात जिल्हा व गावोगावी हे अभियान अधिक जोमाने मा.श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. आभार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पीआयएमसीचे सदस्य मधुकरराव कांबळे यांनी मांडले.

या पाच दिवसीय जादूटोणा विरोधी कायदा  प्रशिक्षण कार्यशाळेत निवड समितीद्वारे राज्यभरातील १०० उत्कृष्ट वक्त्यांची निवड करण्यात आली असून ह्या वक्त्यांना जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल सखोल माहिती व निवड झालेल्या वक्त्यांची जबाबदारी ह्या सर्व बाबींचे सविस्तर प्रशिक्षण कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक प्रा.श्याम मानव देत आहेत. कार्यशाळेत प्रशिक्षित झालेले हेच वक्ते पुढे राज्य शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, राज्यभरातील जिल्हे-तालुके, मोठी गावे येथील नागरिक व  शाळा - महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना जादूटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती निवड झालेले मास्टर प्रशिक्षक अ.भा.अंनिस चे जिल्हा संघटक प्रा.इरवंत सुर्यकार यांनी दिली...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी