तरीही धाडसी दरोड्याच धागेदोरे सापडेना ...
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरात गेल्या रविवारी दरडखोरांनी शहरातील प्रतिष्ठित व्यापाराच्या घरी वयोवृध्द पती -पत्नीला माराहण करत व या परिवारातील बाकीच्या सदस्याना एका खोलीत बंद करुन माराहण करित चिमुकल्याच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवून तिजोरीवर दलाल मारण्यात आला होता.
येथील प्रतिष्ठित गंधेवार परिवाराकडुन या दरडखोरांनी आलमारी व तिजोरीच्या चाब्या हस्तगत करुन महागडया दुर्मिळ असे सोन्याचे दागीने सुमारे ७१ तोळे वजनाचे लुटून नेले होते. या बाबतीत हदगाव विधानसभा क्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रत्याक्षात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना मुंबईत भेटुन या बाबतीत निवेदन दिले होते. या बाबतीत मुख्यमंत्रीच्या गृह विभागाकडुन नादेड जिल्हापोलिस अधिक्षक यांना काय सुचना आलेल्या आहे. या बाबतीत माञ पोलिस विभागाकडुन कोणत्याही प्रकारची माहीती मिळत नाही.
विद्यमान आमदाराच्या पञाची कितपत दखल घेतली या बाबतीत तरी पोलिस विभा अधिका-याकडुन विशेष म्हणजे या धाडसी दरोड्या संबधी नेमकी काय प्रगती झाली. या बाबतीत माहीती मिळत नाही विशेष म्हणजे हदगाव पोलिस स्टेशनचे टेलिफोन पण बंद असुन शहरात सीसी टीव्ही कँमेरे असुन, याचा उपयोग पोलिसांना होऊ शकते. दरोड्याची घटना होऊन आज जवळपास आठवडा सरत आहे. तरी या बाबतीत नेमका तपास काय..? झाला या बाबतीत ही काहीच माहीती मिळत नाही.
श्वान पथक...हदगाव शहरात आता पर्यत जितक्या गंभीर घटना घडल्या या बाबतीत श्वान पथक यांची कामगीरी माञ दिसुन येत नाही. शहरात गंभीर गुन्हा घडला की पोलिसाचे श्वान पथक येते तसेच ठसे तज्ञानाही पाचरण करण्यात येते. पण त्यांचा पोलिसांना शोध घेण्यासाठी कुठलीच मदत मिळत नाही अस हदगाव शहरात व परिसरात घडलेल्या घटनेच्या तपासावरुन दिसुन येते. दुसरी विशेष गंभीर बाब अशी आहे की... हदगाव पोलिस स्टेशनला ७० पोलिसांची मान्य पदे असल्याची माहीती आहे. त्यापैकी फक्त ५० %टक्के पोलिस कार्यरत असल्याचे समजते. यामुळे गंभीर गुन्ह्याच्या घटना झाल्यास अपु-या पोलिस संख्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्याचे तपास जैसे थे दिसुन येत आहे.
पोलिस व नागरिक समन्वय हवा - विधानसभा क्षेञेच्या आमदारानी हदगांवच्या दरोड्यासंबधी तपास लागावा थेट मुख्यमंत्री यांना निवेदन दयावे लागते हे हदगाव तालुक्याचे दृष्टीने फार भूषणवाह नाही. सध्या परिस्थिती हदगाव पोलिस स्टेशनला वरीष्ठ पोलिस अधिकारी जेव्हा भेट देतात. आपले कार्यालयीन काम आटोपून शहरातील व परिसरातील स्थानिक जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व्यापारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी पञकार यांच्या कडुन सामाजिक दृष्टिकोनातून सुचना मागवून घ्यायचे परंतु सध्या अशी परिस्थिती दिसुन येत नाही.