शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशील-- आ.केराम -NNL


शिवणी, प्रकाश कार्लेवाड।
किनवट माहूर तालुक्यातील मागील  वीस दिवसापांसून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुले पिके व इतर माहिती राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे संपूर्ण माहिती  लेखी पत्राद्वारे सुपूर्त केली आहे.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशा स्वरूपाची मागणी केली आहे.तर लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.असे मत दि.२७ जुलै रोजी किनवट माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांनी तालुक्यातील इस्लापुर-जलधारा शिवणी परिसरातील शेती नुकसान पाहणी करण्यासाठी आले असता ते परिसरातिल शेतकरी व पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.

किनवट माहूर तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून संततधार च्या पावसामुळे सर्वत्र शेतीपिकाचे शेतजमिनीचे व पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.मागील काहो दिवसाखाली राष्ट्रपती पदाच्या निवडणूक संदर्भात राज्याची राजधानी मुंबई येथे होतो. किनवट माहूर तालुक्यात विशेषतः इस्लापुर जलधारा शिवणी अप्परावपेठ या भागात जेंव्हा पावसाची सुरुवात झाली तेंव्हाच तात्काळ आपण जिल्हा व तालुका प्रशासणास पत्र देऊन शेतकऱ्यांचे पिके नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागणी केली होती.या अनुषंगाने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.विपीन इटनकर व सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार आणि  तहसीलदार डॉ.मृणाल जाधव  यांनी आणि किनवट माहूर तालुक्यातील विविध मंडळातिल भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भर पावसात प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत राहून मला येथील पुर परिस्थितीचा वेळोवेळी आढावा देत होते.


आणि यातून किनवट माहूर तालुक्यात ईतर तालुक्यांपेक्षा किती तरी पटीने मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्याची माहिती  महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समोर ही माहिती देऊन नुकसान झाल्याचे सांगितलो आणि किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशा स्वरूपाची मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.आता फक्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई म्हणून आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.असे मत किनवट माहूर तालुक्याचे आमदार भीमराव केराम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी सोबत तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे बाबुराव केंद्रे,अनिल तिरमनवार,कपिल करेवाड, भागवान हुरदुके,राजू पाटील हुडीकर,काशीनाथ शिंदे, स्वीयसहायक संतोष म्हरस्कोले, तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार,उमाकांत कऱ्हाळे रवी कसबे,रामराव जाधव रिठ्ठा,तुकाराम बोनगीर,प्रकाश दंडे,स्वप्नील गरडे,शेख लतीफ,अहमद भाई कोसमेट,संतोष पेले,विष्णू दराडे,रमेश बोड्डेवाड,सरपंच नागोराव बंकलवाड,श्रीराम रेड्डी,विठ्ठल सिंगरवाड, शिवाजी भुरके, आदीसह इस्लापुर,कोसमेट,शिवणी, कुपटी, झळकवाडी,जलधारा,दयाल धानोरा,परिसरातील शेतकरी बांधव भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी राज्यात नवीन सरकार स्थापित झाल्याने भाजपचे बालाजी आलेवार यांनी आमदार केराम यांना पुष्पहार घालून सत्कार केले.तर आमदार केराम यांनी पत्रकार संघाचे प्रकाश कार्लेवाड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी