नॅशनल हायवे वर हजार झाडांचे वृक्षारोपण
लोहा| आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे व टीमने लोहा- नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर, एक हजार वृक्ष रोपण दुतर्फा केले आहे.रविवारी वृक्ष लागवड करण्यात आली.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत तहसीलदार मुंडे व टीमने वृक्षारोपण हाती घेतले आहे. लोहा-चाकुर टिमच्या वतीने मौजे पार्डी परीसरात एक हजार वृक्ष लागवड केली. शुभारंभ तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नॅशनल हायवेचे श्री शेखर,आळंदकर, विठ्ठल ढोक, इजि.दिपक पाटीदार (प्रौजेक्ट मँनेजर) धर्मेंद्र पाटीदार, अभिषेक मिश्रा, अभिषेक पाराषर,शंकर इंगोले,किरण गिरबीडे, योगेंद्र राऊत, विठ्ठल ढोक, मुकुल धोते,अक्षय सिंग तसेच महसुलचे बारकुजी मोरे, नितीन रायाजी सह परिसरातील ग्रामस्थ, नागरीक,युवक व बालक उपस्थित होते.
लहान मुलांच्या हस्ते काही वृक्ष लागवड करण्यात आली. नव्या पिढीला वृक्ष देतांना वृक्ष संवर्धन काळजी कशी गरज आहे .नँशनल हायवे कडून पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येत आहे. तीन रांगेत लहान, मध्यम,व मोठी तसेच महावृक्ष, करंजी,आपटा,बेल,लिंब, पिंपळ,वड. वृक्षाची लागवड करण्यात येत आहे. ओसाड पडलेली रस्ते भविष्यात नक्कीच हिरवीगार दिसुन येतील व त्यासाठी संगोपन व संवर्धन गरजेचे आहे.