नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पदवी वितरण समारोह संपन्र -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी वितरण समारोह नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात संपन्न झाला.

पदवी वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. अजय टेंगसे, अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. व श्री. जगदीश भंडारवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वजीराबाद पोलीस स्थानक,नांदेड हे उपस्थित होते.कार्यक्रमास अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष श्री. कैलाशचंदजी काला तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डाँ. बी. डी. करे,प्रा.डॉ.विजय तरोडे,डाँ. जीवन मसुरे, डाँ. एस. बी. फड, डाँ. मनीष देशपांडे,प्रा.डॉ.शशिकांत दरगु,श्री संतोष परळीकर, ऊपप्राचार्य अजय संगेवार यांची ही ऊपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि विद्यापीठ गीताने झाली, प्रा. अशोक ठावरे यांनी विद्यापीठ गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक परिक्षा विभाग प्रमुख डाँ. सौ. कल्पना कदम यांनी केले.याप्रसंगी प्रमुख पाहूणे डॉ. दिगंबर नेटके यांनी मार्गदर्शनपर भाषणातून गुरु, आई, वडील आणि समाजाचं आपण काही देणं लागतो, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी असे आवाहन केले. डॉ.अजय टेंगसे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी हीत, मुल्य शिक्षण या विषयावर मार्गदर्श आपले मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट केले. श्री भंडारवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम पासून सावधान राहण्याचा इशारा दिला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ. सुधीर शिवणीकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व जिवनाच्या पुढील टप्यात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातुन जे संस्कार झाले त्याचा निश्चीत ऊपयोग करावा असे अवाहन केले.कार्यक्रमांमध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर स्नातकांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. विजय तरोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किशोर इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील परीक्षा विभागातील कर्मचारी श्री. आनंदराव सूर्यवंशी, श्री. शिवराज आप्पा सोनटक्के, श्री. उमाकांत कल्याणकर, श्री. मदन कुलकर्णी, श्री. राहुल सोनटक्के, श्री. मयुरेश विष्णुपुरीकर ,श्री. रामेश्वर इजळकर व सौ. अनुराधा यशवंतकर यांनी  महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी