लहान एस टी,येळेगाव ओपन तर मालेगाव ओबीसी
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील लहान जि प गट एस. टी.,मालेगाव जि प गट ओबीसी,येळेगाव गट ओपन ला सुटला असून,लहान गटात खुल्या व ओबीसी प्रवर्गातून अनेकांनी तयारी केली होती,त्यांचा हिरमोड झाला आहे.
अर्धापूर तालुक्यातील ३ जि प गटाचे व ६ पंचायत समिती गणाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले,हादगाव तालुक्यातील ७ गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश होऊन लहान जिल्हा परिषद गटाची नव्याने निर्मीती झाली, यामध्ये सर्वसाधारण, ओबीसी चे अनेक ईच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती,पण त्यांचा हिरमोड झाला,येळेगाव गट सर्वसाधारण,मालेगाव गट नामाप्र ओबीसीला सुटले आहे,तर पार्डी (म) पंचायत समिती अनुसुचित जाती प्रवर्ग, लहान गण सर्वसाधारण, मालेगाव गण नामाप्र,कामठा गण सर्वसाधारण महिला,येळेगाव सर्वसाधारण महिला,पिंपळगाव (म) सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहेत.
हारकती देण्याच्या वेळेत हारकती देतील. भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुका असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.आरक्षणाचे काम उपविभागीय अधिकारी विकास माने, सहाय्यक तहसीलदार उज्वला पांगरकर, मारोतराव जगताप यांनी काम पाहिले.