विज्ञान व तंत्रज्ञाचे मूळ ‘गणित’ हेच आहे-माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे -NNL


नांदेड|
गणिताला खूप मोठा इतिहास आहे. अगदी हजारो वर्षापासून गणितावर अध्ययन व संशोधन चालू आहे. काळानुरूप त्यामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. आज आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत तसे-तसे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने प्रगती होत आहे. गणित आणि विज्ञान व तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान व तंत्रज्ञाचे मूळ हे ‘गणित’ आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.

ते आज दि. २८ जुलै, रोजी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये गणितीयशास्त्र संकुलातर्फे आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने गणितीय विज्ञान विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू तथा परिषदेचे अध्यक्ष डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, जी.एल.ए. विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिरुद्ध प्रधान, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, संकुलाचे संचालक प्रा. डॉ.डी. डी. पवार यांची उपस्थिती होती.

पुढे डॉ. निमसे म्हणाले की, २००९ मध्ये या संकुलाची स्थापना माझ्या कार्यकाळात झालेली आहे. त्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जाऊन या संकुलाची स्थापना केली आहे. पण आज या संकुलाची प्रगती बघून समाधान होत आहे. त्याहीपेक्षाही या संकुलातील विद्यार्थ्यांची प्रगती बघून आनंद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नवसंशोधकांनी नवीन विषयावर संशोधन करण्यासाठी स्वतःला अद्यावत करून घ्यावे, येथील झालेल्या परिसंवादामधून तुमच्या माहितीमध्ये भर पडणार आहे. त्यामुळे निश्चितच संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

मथुरा येथील जी.एल.ए. विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिरुद्ध प्रधान म्हणाले गणिताशिवाय या विश्वामध्ये कुठलीही तर्कसंगत प्रगती शक्य नाही. त्याचबरोबर त्यांनी विज्ञान, आरोग्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, स्पेस तंत्रज्ञान इ. अनेक क्षेत्रांमध्ये गणिताला अनन्य साधारण महत्व आहे. अध्यक्षीय समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाची आजपर्यंतची वाटचाल, विकास आणि पुढील दिशा यावर विस्तृत विवेचन केले. आज जगामध्ये गणितीय विज्ञानामध्ये काय प्रगती झाली आहे. हे या परिषदेच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांना शिकावयास मिळणार आहे. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्यावत करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शितल कौर दरोगा यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी केले. या परिषदेस देश-विदेशातील संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एन.एस. दारकुंडे, डॉ. यु.के. सांगळे, डॉ. ए.ए. मुळे, प्रा. यू.एस. दिव्यवीर, डॉ. रूपाली जैन हे अहो-रात्र परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात प.पु. स्वामी रामानंद यांच्या व गणिततज्ञ श्रीनिवासा रामनुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने उद्घाटन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी