हिमायतनगर। तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्याचं अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या नुकसान बाबत तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी दिनेश राठोड खैरगावकर यांच्यासह शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.
संततधार पावसामुळे अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील गोरगरीब शेतकरी बांधवांच्या शेतीचे व पिकांची जे नुकसान झाले. त्या सर्व बाबींचे तातडीने पंचनामे करुन मदत देण्यात यावे याबद्दल मौजे, सिरंजनी गावातील युवा शेतकऱ्यांच्या वतीने मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील असंख्य गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान व काही शेतकरी बांधवांच्या घराची पडझड होवून ती उघड्यावर आली आहे व संततधार पावसामुळे काही निष्पाप जनावरांना जिव गमवावा लागले आहे.
या सर्व बाबी मा. तहसीलदार साहेबांना ज्ञात करुन दिल्या व या सर्वच बाबींचे तातडीने पंचनामे करुन तालुक्यातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, मायबाप शेतकरी जनतेला प्रकाशनाने मदत द्यावी ही विनंती केली. यावेळी माझ्यासह, सिरंजनी गावातील काही युवा शेतकरी बांधव व तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व इत्यादी गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.