नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलात दि.२८ ते ३०जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी देश-विदेशातून विविध नामांकित संस्थेमधील गणित व संख्याशास्त्र विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेसाठी २५० पेक्षा अधिक संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी नोंदणी केलेली आहे.
या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधक ब्राझील येथील डॉ. डॉस राफाईल, जपान येथील डॉ. शिंझी मुकोयामा, इमोरी युनिव्हर्सिटी अटलांटा येथील डॉ. व्हि. सुरेश, युनायटेड किंगडम युनिव्हर्सिटी ऑफ केब्रिज येथील डॉ. सनी व्हॅग्नोझी, तुर्की येथील डॉ.अली ओव्हगन, आय.एन.एस.ए., दिल्ली येथील डॉ. सुधांशु अग्रवाल, आय.आय.टी. मुंबई येथील डॉ. एस. आर. घोरपडे, आय.एम.एस्सी. चेन्नई येथील डॉ. श्रीनिवास, बीआयटीएस, पिलानी हैदराबाद येथील डॉ.पी.के. साहू, आयआयटी, मंडी येथील डॉ. सय्यद आब्बास इत्यादी देश-विदेशातील नामांकित गणित व संख्याशास्त्र तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या परिषदेच्या आयोजनाचीतयारी अंतिम टप्प्यात आहे. यासाठी संकुलाचे संचालक व परिषदेचे आयोजक डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि सहकारी वर्ग परिश्रम घेत आहेत. सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले आहे. सदरील परिषद ही विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांच्या संशोधन वाढीसाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे.