मुखेड, रणजित जामखेडकर। "देश को देखणे का बदल लो नजरिया... , यहा चलता है संविधान नही चलेगा शरिया.. " देशात दिवसेंदिवस हिंदु समाजावर वाढत चाललेल्या क्रुर हल्ल्याच्या निषेधार्थ मुखेड शहर तालुक्यातील सकल हिंदु समाज बांधवांच्या वत्तीने आज रविवार दि.२४ जुलै रोजी दु. ०१ वाजता मुकमोर्चा काढण्यात आला.
हिंदू समाज बांधवांचा मुक मोर्चा मुखेड शहरातील तेलीपेठ हनुमान मंदिर येथुन शहरातील मुख्य रस्त्यावरून शांततेत तहसील कार्यालयावर हजारोंच्या उपस्थितीत धडकला. देशातील निष्पाप हिंदू समाज बांधवांच्या दिवसाढवळ्या क्रुर पणे हत्या होत आहेत या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देऊन हिंदू समाज बांधवांना न्याय द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील हजारो समाज बांधवांच्या उपस्थित मुक मोर्चा काढुन मुखेडचे तहसीलदार,पोलिस प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, ह.भ.प अंबादास महाराज पाळेकर, गंगाधर पा, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव उच्चेकर,जेष्ठ भाजप नेते टि.व्ही सोनटक्के , गिरीष वझलवार, भाजपा शहर अध्यक्ष किशोरसिंह चव्हाण,लक्ष्मण पा. खैरे, आनंदा पाटील जुन्ने, गणेश पा जाधव, दत्ता पाटील, शिवलिंग नाईक चांडोळकर,
नगरसेवक दीपक मुक्कावार, अशोक चौधरी, सुधीर चव्हाण, बजरंग कल्याणी, संगमेश्वर देवक्तते, गजानन साखरे, डॉ.रणजित काळे,महेश मुक्कावार, बजरंग दल तालुका संयोजक शंकर नाईनवाड, शिवकुमार महाजन , कैलास पोतदार, अविनाश काळे, गिरीश देशपांडे, बबन ठाकूर,मनोज जाजू,बजरंग दल शहर संयोजक संजय वाघमारे, विनोद दंडलवाड, राजू रणभिडकर, छावा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पा. केरूरकर, राजू गुडमेवाड, ज्ञानेश्वर श्रीमंगले, बसवराज चाफुले, विलास गडमवाड, सतीश डाकुरवार, शिवकुमार बंडे,कुलदीप गायकवाड, राजु काळे, गणेश आंबेकर, यांच्या सह विश्व हिंदू परिषद,बजरंग दल व सकल हिंदु प्रेमी बांधव समाजावरील वाढत चाललेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपले धर्म - कर्तव्य समजून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.