पावसाळी समर स्पेशल व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडुन नागपूर मडगाव नागपूर प्रतिक्षा एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय -NNL


नागपूर।
आगामी पावसाळी समर स्पेशल व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात व कोकणातील प्रवाशांना विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वेकडुन ०११३९/०११४०नागपूर मडगाव नागपूर प्रतिक्षा एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२७जुलै रोजी या रेल्वे गाड्या सुटणार असून बडनेरा जं थांबा असल्याने बडनेरा ते रत्नागिरी,मडगाव जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे ०११३९नागपुर जं रेल्वे स्थानकावरून १५.०५ सुटेल  व दुसऱ्या दिवशी मडगाव येथे१७.३० वा पोहोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता ०११४० मडगाव जं २१.३० वा  सुटणार  आहे व दुसऱ्या दिवशी नागपूर येथे १९.०० वा पोहोचणार आहे 

या रेल्वेसेवेला नागपूर जं,वर्धा जं,पुलगाव,धामणगाव,बडनेरा जं, अकोला जं,मलकापूर,भुसावळ जं,नाशिक रोड,इगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,वीर,खेड,चिपळूण,सावर्डा,आरवली रोड ,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,अडवली,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,नांदगाव रोड,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ,सावंतवाडी रोड,थिवीम,करमाळी मडगाव स्थानकावर थांबा देण्यात आले आहेत.

सदर ०११३९/०११४० नागपूर मडगाव नागपूर द्वि साप्ताहिक  सुपरफास्ट प्रतिक्षा एक्स्प्रेस स्पेशल शयनयान,तृतीय वातानुकूलित, व्दितीय वातानुकूलित आरक्षित व सेकंड सिटीग अनारक्षित पुर्णपणे नागपूर वरून बुधवार,शनिवार २७जुलै २०२२ते २९ सप्टेंबर २०२२चालवण्यात आहे. मडगाव वरून गुरूवार,रविवार २८ जुलै २०२२ ते २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत द्वि साप्ताहिक सुपरफास्ट प्रतिक्षा एक्स्प्रेस चालवण्यात धावणार आहे 

या रेल्वेसेवेला कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस श्री वैभव बहुतूले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव,रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, नागपूर खासदार व रस्ते,वाहतूक,सडक,महामार्ग, राजमार्ग, परिवहन,दळणवळणमंत्री  नितीन गडकरी,वर्धा खासदार रामदास तडस,भंडारा खासदार सुनिल मेंढे,अमरावती खासदार नवनीत राणा,अकोला खासदार संजय धोत्रे,बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव,जळगाव खासदार उन्मेष पाटील,नाशिक खासदार भारती पवार ०११३९/०११४० नागपूर मडगाव नागपूर ही रेल्वेसेवा कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती 

या ०११३९/०११४०नागपुर मडगाव  नागपूर प्रतिक्षा एक्स्प्रेस रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण १६ जुलै पासुन सुरू करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,पुणे कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई यशवंत परब,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय महिला रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्षा शबनम शेख, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगावकर,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव,पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत,दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी