लोहा| राज्य शासन योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना चालू वित्तीय वर्षातील माहे एप्रिल, मे व जून या तीन महिण्याचे एकत्रित अनुदान उपलब्ध झाले आहे सदर अनुदान लाभार्थ्यांच्या बँक / पोस्ट खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती लोहयाचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान पी.एफ.एम.एस. प्रणालीवरच निधी प्राप्त होणार असून तांत्रिक अडचणीमुळे सदर योजनेचा निधी प्राप्त होण्यास अजूनही काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन केंद्र पुरस्कृत योजना वगळता राज्य पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्य शासन योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना सन 2022-2023 या वित्तीय वर्षातील प्राप्त अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.
तहसीलदार व्यंकटेश मुंडे या विभागाचे नायब तहसीलदार राम बोरगावकर, या विभागाच्या प्रमुख सौ मुंडे यांनी संगांनि योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकार कडून प्राप्त होतातच वेळेवर त्यांना अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केले आणि आता अनुदान वितरीत झाले आहेत. तांत्रिक अडचणी मुळे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वाटप करता येवू शकले नाही, याची संबंधीत लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार लोहा यांनी केले आहे.