मुखेड, रणजित जामखेडकर| धनज / जामखेड गट ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदी गणेश मारोतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुखेड तालुक्यातील मौजे धनज / जामखेड ग्रामपंचायतीची आज सकाळी ११ वाजता विशेष ग्रामसभा सरपंच सौ.अनिताताई गोपाळराव पा.मुकदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या विशेष ग्रामसभेत हर घर तिरंगा, जल जिवण मिशन या विषयावर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली व तदनंतर यापुर्वीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्व. शिवाजी पाटील यांच्या दुःखद निधनामुळे मागील ६ महिन्या पासून रिक्त असलेल्या तंटामुक्त समितीच्या कार्यकारणी निवडीचा विषय ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला.
यामध्ये गावातील सर्व उपस्थित नागरिकांनी ग्रामसभेत चर्चा करून गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेश पाटील यांची धनज / जामखेड ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ.शोभा बाच्चीपळे, उपसरपंच सौ.अज्ञानबाई मारोती पा. होडगीरे , ग्रा.प सदस्य प्रयागबाई शेषेराव पा . बोडके , ग्रा.प.सदस्य शंकरराव हाळदे,यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.