उमरी/नांदेड। शासनाच्या धोरणानुसार आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा कार्यक्रम राबविण्यात उदासीनता दिसून येते आहेधर्माबाद शहरातील व तालुक्यातील शासकीय अधिकारी यांनी अद्याप पर्यंत शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारची जन जागृती सर्व सामान्य प्रतिष्ठीत नागरिक पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली नाही.
संबंध देशात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सदरील संदर्भात जनजागृती शासकीय अधिकारी यांचे कडून होत असताना धर्माबाद शहरातील व तालुक्यातील सर्व च प्रशासन निष्क्रिय दिसत आहे. कारण हे सर्व अधिकारी बाहेर गावाहून येणे जाणे करतात त्यांचं नेहमी सर्व सामान्य नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. तसाच प्रकार शासनाच्या धोरणाकडे पण दुर्लक्ष केले जाते आहे.
जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही म्हणून धर्माबादचे उपनगराध्यक्ष रमेश चंद्र तिवारी यांनी जिल्हा अधिकारी व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यां कडून होत असलेल्या दुर्लक्ष ची माहिती लेखी निवेदना द्वारे केली आहे.