थायरॉइड उपचारात होमिओपॅथीला प्रथम प्राधान्य द्याव : डॉ. शेख मोहम्मद साजिद -NNL


नांदेड।
सध्या भारतात थायरॉइड आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वच वयोगटांत या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड या प्रकारच्या थायरॉइडच्या आजाराचे रुग्ण प्रमुख्याने मोठ्या प्रमाणात दिसतात. या दोन्ही प्रकारच्या आजारात पेशंटला आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. परंतु नांदेड येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ तथा डॉक्टर शेख मोहम्मद साजिद हे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे नांदेड जिल्हाध्यक्ष आहेत .

डॉ.मोहम्मद शेख साजिद यांनी याबाबत संशोधन करून क्लिनिकल ट्रायल बेस्ड होमिओपॅथी उपचार पद्धतीने हजारो रुग्णांना थायरॉइडच्या आजारातून पूर्ण बरे केले आहे. तसेच हे रुग्ण आता गोळीमुक्त आयुष्य जगत आहेत, अशी माहिती डॉ. शेख मोहम्मद साजिद यांनी 'दै उद्याचा मराठवाडा'शी बोलताना दिली.

पेशंटचे वजन वाढणे किंवा कमी होणे, आळस, झोप जास्त किंवा कमी येणे, थकवा, दम लागणे, अंगात जडपणा, चिडचिड, घबराट, छातीत धडधड, घाम जास्त येणे, नैराश्य, अचानक मूड बदलणे, विनाकारण रडू येणे, हात-पाय थरथर होणे, डोळ्यांचा आकार मोठा होणे, चक्कर येणे अशा प्रकारची लक्षणे थायरॉइडच्या आजारात दिसतात. डॉ. शेख यांच्या स्पेशालिटी उपचारांनी हे त्रास व लक्षणे पूर्णपणे बरी होतात. तसेच हळूहळू थायरॉइडच्या गोळ्या बंद होतील.

नांदेड येथील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ असलेल्याअसलेल्या डॉ. शेख मोहम्मद साजिद यांच्याशी थायराइड आजाराने त्रस्त रुग्ण हे त्यांच्या होमिओपॅथी क्लिनिकमध्ये संपर्क साधून या उपचार पद्धतीचा लाभ घेऊ शकतात, असे आवाहन डॉ.शेख मोहम्मद साजिद यांच्या होमिओपॅथी क्लिनिककडून करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी