मुलानेच केली पित्याची हत्या,खेडकरवाडी येथील वर्षातील दुसरी घटना -NNL


माळाकोळी, बालाजी नागसाखरे।
माळाकोळी पासून जवळच असलेल्या मौजे खेडकरवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील पोटच्या दोन मुलांनी बापाचा खून केला असल्याची घटना 30 जून रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता घडली आहेखेडकरवाडी हे गाव लिंगायत समाजाचे असुन र्‍हदय विधारक हि दुसरी घटना आहे .

याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे खेडकरवाडी तालुका लोहा येथील आरोपी सचिन हावगी कल्याणी व आरोपी हनुमंत हावगी कल्याणी राहणार खेडकरवाडी वय 32 वर्ष अंदाजे व्यवसाय  शेती यांनी आपल्या वडिलांचा 30 जून रोजी आपल्या शेतात पेरणीचे व इतर कारणावरून मयत हावगी नारायण कल्याणी राहणार खेडकरवाडी वय 50 यांना जमिनीवर पाडून आरोपी हनुमंत हावगी कल्याणी यांनी स्वतःच्या वडीलाचे पाय बांधले व आरोपी सचिन हावगी कल्याणी राहणार खेडकरवाडी यांनी आपल्या वडिलांच्या छातीवर बसून दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. 

असून या घटनेची नोंद माळाकोळी पोलिसात फिर्यादी प्रभाकर घनश्याम वलांडे वय 51 वर्ष राहणार खेडकरवाडी व्यवसाय मजुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचे मुले सचिन हावगी कल्याणी व हनुमंत हावगी कल्याणी राहणार खेडकरवाडी यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलिसात गुन्हा रजिस्टर 72/22 कलम अन्वये 302,504,34 भा. द. वि. नुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. डोके तपास करत आहेत. मयत हावगी नारायण कल्याणी राहणार खेडकरवाडी यांची डेडबॉडी 24 तासापासून माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून असून, बातमी लिहीपर्यंत तरी अंत्यविधी करण्यात आला नव्हता.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी